आदर्श शिक्षकाने दिला गरजूंना मदतीचा हात
मारेगाव : सचिन मेश्राम
उपक्रमशील , आदर्श शिक्षक , विविध सामाजिक संघटनेचे प्रतिनिधी म्हणुन परिचित असलेले सामाजिक कार्यकर्ते गोपाल कन्नाके यांनी कडक लॉकडाऊन मध्ये हातावर पोट असणाऱ्या लोकांची होणारी उपासमार लक्षात घेऊन मांडवी सर्कल मधील पिंपळगांव ( सि ) , तलाईगुडा , लिमगुडा , कोलामपोड , मांडवी , फुलेनगर , कोलामपोड (मा) पिंपळगांव फाटा , भिलगांव , दरसांगवी इत्यादी गावांतील अनाथ , अपंग , विधवा , मजूर , भूमिहीन , दारिद्र्य रेषेतील लाभार्थी , उपेक्षित - दुर्लक्षित वेडसर , अशा एकूण ५१कुटुंबांना शासनाच्या आदेशानुसार कोरोनाचे नियम पाळून किराणा सामान अन्नपूर्णा एकूण ५१ किट , २०० मास्क , ५१ सेनिटायझर स्प्रे देत कोरोनापासुन घ्यावयाची काळजी सांगत वेळोवेळी स्वच्छ हात धुण्याचे महत्व पटवुन देत मदतीचा हात दिला.
किनवट तालुक्यातील मांडवी येथील कोविड हॉस्पिटल सेंटरला भेट देत येथील आरोग्य कर्मचाऱ्यांशी हितगुज करत कोरोना योद्धे म्हणुन उल्लेखनीय कामाबद्दल संपुर्ण हॉस्पिटल स्टॉपचे ऋण यावेळी व्यक्त केले. १०० मास्क व दहा लिटर सेनिटायझरही यावेळी भेट दिले.
दरवर्षी प्रमाणे यंदाही विविध मानवतावादी उपक्रम घेत गरजूना मदतीचा ओघ वाढवित आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त गोपाल कन्नाके यांनी वाढदिवस साजरा केला.यावेळी त्यांच्या समवेत कुटुंबातील सदस्य , मित्र मंडळी उपस्थित होते.