आता शिवसेनेच्या वतिने शहरात फोगींग फवारणी ,
कोरोना काळात शिवसेना उतरली जनतेच्या सेवेत
रोहन आदेवार
जिल्हा प्रतिनिधी
वणी : सद्या वणी शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला असुन रुग्ण संख्याही दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. परंतु कोरोनाचा रोकथाम करण्यासाठी लोकप्रतिनिधींसह, संबंधित यंत्रना सजग असल्याचे दिसुन येत नसल्यामुळे आता शिवसेनेने पुढाकार घेतला असुन शिवसेनेचे वणी विधानसभा संघटक सुनील कातकडे, वणी शहर प्रमुख राजु तुराणकर,
उपजिल्हाधिकारी अजिंक्य शेंडे यांच्या माध्यमातुन गरजु रुग्णांना ऑक्सिजनची व्यवस्था करणे, अँम्बुलंसची व्यवस्था, कोविड केंद्रात ऐक्झेट फँन ची व्यवस्था, शहरात स्वच्छता अभियान राबविने, सॅनिटायझर निर्जंतुकीकरण फवारणी असे उपक्रम सुरू करण्यात आले असुन आज फोगींग मशिनद्वारे शहरात फवारणी सुरु केली आहे. या उपक्रमात आयडॉल पेस्ट कंट्रोल विभाग प्रमुख मंगल भोंगळे शाखा प्रमुख जनार्दन थेटे यांनी यांनी महत्वाची भूमिका पार पाडली.
या कोरोना काळात शिवसेनेने पुढाकार घेतल्याने नागरीकांत समाधान व्यक्त होत आहे.