पुन्हा कोरोनाचा विळखा..
मारेगावात सहा जन पॉझिटीव्ह
- दोन महिलांचा समावेश
मारेगाव : सचिन मेश्राम
मारेगाव शहरात कोरोना संसर्गजन्य विषाणुने पाय रोवने कायम ठेवून आज शनिवारला आलेल्या आरोग्य विभागाच्या अहवालात मारेगाव शहरात सहा जन बाधीत निघाल्याचा शिक्कामोर्तब झाला.दिवसेंदिवस वाढत असलेल्या संसर्गाने मारेगाव सह तालुक्याची चिंता वाढत असल्याने ही साखळी खंडीत करण्याची गरज निर्माण झाली आहे.
मारेगाव तालुक्यात बाधितांचा आकडा फुगत असतांना आज आलेल्या अहवालात ग्रामिण भाग निरंक ठेवण्यावर यश मिळविले.मात्र शहराचा पाठलाग करतांना कोरोना विषाणूने शहराचा अर्धा डझन ने आकडा फुगवीला. त्यामुळे तालुक्यावर चिंतेचे सावट निर्माण झाले आहे.
दरम्यान,आज प्राप्त अहवालात मारेगाव येथील प्रभाग क्रमांक ६ मध्ये तीन ,प्रभाग क्रमांक बारा मध्ये दोन व प्रभाग तीन मध्ये एकाचा समावेश आहे.यात दोन महिलांचा समावेश आहे.शहरात वाढत्या बाधीत रुग्णा मूळे आगामी काळात संकट गडद होण्याची संभाव्य शक्यता निर्माण झाली आहे.