कोरोना संसर्गाचा पाठलाग...
मारेगाव तालुक्यात पुन्हा सात जन पॉझिटीव्ह
- मारेगाव पोलिस वसाहतीत कोरोनाची एन्ट्री
मारेगाव : सचिन मेश्राम
मारेगाव तालुक्यात कोरोना संसर्गजन्य विषाणू पाठलाग करित असल्याने तालुक्यात चिंतेची भर पडत आहे.आज रविवारला प्राप्त अहवालात मारेगाव
तालुक्यात सात जन बाधीत निघाले.यात मारेगाव शहरातील पोलिस वसाहतीत कोरोनाने एन्ट्री केली आहे.
मारेगाव तालुक्यातील कोरोना संसर्गजन्य विषाणु बाधितांचा आकडा दिवसागणिक फुगत असल्याचे चित्र आहे.त्यामुळे मारेगाव करांच्या चिंतेत भर पडत आहे.दरम्यान आज आरोग्य विभागाचा प्राप्त अहवालात मारेगाव पोलिस वसाहतीत एक तर तालुक्यातील कोलगाव येथे ४ व गोधणी येथे दोघे जन बाधीत निघाले.मारेगाव तालुक्याचा आकडा बेरजेत रुपांतर होत असल्याने सामाजीक अंतर,नियमित मास्क,कामानिमित्तच बाहेर पडावे,कायम सेनिटायझर वापरण्यात कसुर करु नये असे आवाहन प्रशासना कडुन करण्यात आले आहे.