वरोरा विधानसभेचे माजी आमदार तथा माजी मंत्री संजय देवतळे यांचे आज कोरोनाने दु:खद निधन
प्रतिनिधी:वरोरा
वरोरा विधानसभेचे माजी आमदार तथा माजी मंत्री संजय देवतळे यांचे आज कोरोनाने दु:खद निधन झाले त्यांनी नागपूरच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असतांना आज आखरीचा श्चास घेतला राज्याचे
सांस्कृतिक मंत्री व जिल्हाचे ते माजी पालक मंत्री सुध्दा राहुन गेले राजकीय क्षेत्रात त्यांनी चागली पक्कड केली होती अनेक वर्षे ते वरोरा विधानसभेचे काँग्रेस पक्षाकडून आमदार म्हणून निवडून आले होते व सांस्कृतिक मंत्री व चंद्रपूर जिल्हा चे पालकमंत्री होऊन गेले.नुसत्या झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी शिवसेना पक्षाकडून वरोरा विधानसभा लढवली होती.काही महिण्यांपुर्वी त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला होता. मात्र मागील वर्षी पासून त्यांना कोरोनाची लागण झाली होती काही दिवसापूर्वी एका खाजगी रूग्णालयात दाखल होवून उपचार घेत होते आज माजी. मंत्री संजय देवतळे यांचे निधन झाले त्यांच्या निधनाने राजकीय क्षेत्राची मोठी हानी झाली आहे.