आपटी जवळ एकाची फाशी घेऊन आत्महत्या
सासुरवाडीला आला होता पाहुनचाराला
मारेगाव तालुका प्रतिनिधी
भास्कर राऊत
सासुरवाडीला पाहूनचारासाठी आलेल्या जावयाने सासुरवाडीजवळच असलेल्या (उजाड - चारगाव )शिवारात झाडाला लटकत फाशी घेतल्याची घटना घडली असून फाशी घेतलेल्या व्यक्तीचे नाव महादेव मारोती ब्राम्हणे वय 48 असे असून तो वणी जवळील लालगुडा येथील रहिवासी आहेत.
लालगुडा, वणी येथील महादेव ब्राम्हणे यांची आपटी ही सासुरवाडी आहे. ते सासुरवाडीला पाहूनचारासाठी आलेले होते. सासुरवाडीला आल्यानंतर संडासला जातो म्हणून ते डब्बा घेऊन बाहेर गेले ते शेवटचेच. ते घरी परत आले नाही. ही घटना 22 एप्रिलच्या रात्री घडली. आपटी जवळ असलेल्या चारगाव या उजाड शिवारात कडू निंबाच्या झाडाला टांगून घेत महादेव यांनी जीवनयात्रा संपविली. आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नाही. महादेव यांची पत्नी लालगुडा येथेच असून ते एकटेच सासुरवाडीला आले होते. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक जगदीश मंडलवार यांचे मार्गदर्शनाखाली बिट प्रभारी ना.पो.कॉ.रजनीकांत पतीलव पो.कॉ.विनेश राठोड करीत आहेत.