ग्राहक प्रहार संघटनेचे जिल्हा सचिव प्रसाद नावलेकर यांचे निधन
मारेगाव : सचिन मेश्राम
जिल्हा ग्राहक प्रहार संघटनेचे सचिव प्रसाद नावलेकर (५२) यांचे यवतमाळ येथील खासगी रुग्णालयात उपचारा दरम्यान निधन झाले.त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच जिल्हा संघटनेत शोककळा पसरली आहे.
मागील अनेक दिवसा पासुन ग्राहक प्रहार जिल्हा संघटनेचे सचिव म्हणून कार्यभार सांभाळतांना त्यांनी प्रशासकीय व्यवस्थेला वठणीवर आणले होते.नानाविध प्रलंबित प्रश्नाला त्यांनी न्यायिक भुमिका पार पाडली होती.त्यांच्या सकारात्मक स्वभावाने प्रशासनात वेगळीच छाप होती.ते वणी येथील यवतमाळ अर्बन बँकेत वसुली अधिकारी म्हणून कार्यरत होते.
पांढरकवडा येथे वास्तव्य असलेल्या प्रसाद नावलेकर यांचा जिल्ह्यात मित्रपरीवारांचा मोठा गोतावळा होता. मागील आठ दिवसापासून यवतमाळ येथील खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर कोरोना संसर्गाचा उपचार सुरु असतांना आज रविवारला सायंकाळी ७.३० वाजताचे दरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.त्यांच्या अकाली निधनाने सर्वत्र शोककळा पसरली आहे.प्रसाद नावलेकर यांच्या पश्चात पत्नी,एक मुलगा व एक मुलगी असा आप्तपरिवार आहे.