मारेगावात पी.पी.ई .किट बेवारस
- आरोग्य विभागाचा गलथान कारभार चव्हाट्यावर
मारेगाव : सचिन मेश्राम
कोरोना आजाराच मुकाबला करण्यासाठी विशेषता: कोरोना बाधितावर उपचार करण्यासाठी डॉक्टरांनी वापरलेली पीपीई किट मारेगावच्या एका लेआऊट मध्ये बेवारस रित्या पडलेली आहे.ही किट वापरण्यात आल्यानंतर तिला जाळुन नष्ट करणे अनिवार्य असते मात्र ही किट कोविड सेंटर च्या लगत लेआऊट मध्ये
बेवारसस्थितीत पडुन त्यावर दगडे ठेवून कमालीचे दुर्लक्ष करण्यात येत आहे.त्यामुळे आरोग्य विभागाचा गलथाण कारभार चव्हाट्यावर आला आहे.किंबहुना नागरिकांत भितीदायक वातावरण निर्माण झाले आहे.
मारेगाव तालुक्यात कोरोना संकट गडद होतांनाचे वास्तव आहे.कोरोना बाधीत रुग्णांवर उपचार व्हावा या करिता स्व .चिंधूजी पुरके आश्रम शाळेत कोविड सेंटर सुरु करण्यात आले आहे.येथे कोरोना तपासणी व बाधीत रुग्णांवर उपचार करण्याकरिता डॉक्टर पीपीई म्हणजेच वैयक्तीक सरंक्षण साधनांचा वापर करण्यावर भर देतात.यामुळे स्वत: ला विषाणु बाधा होण्याचा संभव कमी असतो.
दरम्यान मारेगाव कोविड सेंटर नजिक एका लेआऊट मध्ये ही पीपीई किट बेवारस रित्या पडलेली आहे.विशेष म्हणजे त्यावर दगडे ठेवलेली ही किट आहे आणि याच लेआऊट मध्ये दोन ते तीन जन बाधीत आहे. त्यामुळे आरोग्य विभाग साखरझोपेत असल्याचा प्रत्यय येतो आहे.
परिणामी,बहुतांश कोविड सेंटर वर पीपीई किट बायोमेडीकल वेस्ट करिता पाठविण्यात येते मात्र मारेगाव येथील कोविड सेंटर मागे ही किट जाळुन नष्ठ करण्यात येत असल्याची माहिती कोविड सेंटरच्या सूत्रांनी दिली.येथील कोविड सेंटर प्रशासनाच्या हलगर्जीपणाने पीपीई किट तुर्तास दगडे ठेवून बेवारसरित्या पडलेली आहे.त्यामुळे प्रशासनाचा गलथाणपणा चव्हाट्यावर येत आहे.नागरिकांना संभाव्य धोका पोहचण्यापुर्वी सदर किटचा सोक्षमोक्ष लावण्याची गरज निर्माण झाली आहे.