" एल्गार " ची दखल
प्रशासन खडबडून जागे...
पी.पी.ई .किट हलविली !
मारेगाव: सचिन मेश्राम
संवेदनशील प्रश्नाला नियमित अग्रस्थान देवून प्रशासनाच्या डोळ्यात अंजन घालणाऱ्या "एल्गार " न्यूज नेटवर्कने पीपीई किट बेवारस असल्याचे वृत्त प्रकाशीत करताच मारेगाव प्रशासन खडबडून जागे होत किट अवघ्या वेळात हलवून जाळली.
मारेगाव कोविड सेंटर मधुन सोसाट्याच्या वार्याने उडत पी.पी.ई .किट थेट एका लेआऊट मध्ये पडली.मात्र ही किट उडत गेल्याचे कोणाच्याही लक्षात येवू नये याबाबत आश्चर्य व्यक्त केल्या जात होते.परिणामी या किट वर दगडाचा माराही चढविण्यात आला.त्यामुळे या परिसरात भितीदायक वातावरण निर्माण होत प्रशासनाचे तकलादू धोरण चव्हाट्यावर आले.
पी.पी.ई .किट बेवारस असल्याचे वृत्त व्हायरल होताच प्रशासन खडबडून जागे झाले.वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेत सफाई कामगारांना तातडीने किट उचलण्याचे आदेश दिले.सदरील किट हलवित जाळण्यात आल्याची विश्वसनिय माहिती आहे.एल्गार वृत्ताच्या दणक्याने लेआऊट परिसरातील नागरिकांनी तुर्तास भितीदायक सुटकेचा श्वास सोडीत समाधान व्यक्त केले.