कोरोना अपडेट...
मारेगाव तालुक्यात २५ बाधीत
- शहरात तीन पॉझिटीव्ह
मारेगाव : सचिन मेश्राम
मारेगाव तालुक्यात कोरोनाने पॉझिटीव्ह चा दुहेरी आकडा कायम ठेवीत आज शनिवारला तालुक्यात २५ तर शहरात तिघा बाधितांची नोंद केली.त्यामुळे वाढत असलेल्या कोरोना रुग्णाच्या आलेखाने पुन्हा मारेगाव तालुक्यात चिंतेची भर पडली.
तालुक्यातील वातावरणात कमालीचा बदल होवून संपुर्ण तालुका फणफणतो आहे.ग्रामिण भागासह शहरातील नागरिक सर्दी,ताप,खोकल्याने वैतागले आहेत.अशातच कोरोना संसर्गाने पाय पसरने कायम ठेवीत आज २५ चा आकडा गाठला.ग्रामिण भागातील देवाळा येथे १०, गाडेगाव १,मजरा २,सराटी ३, कोलगाव २,बोटोणी २ ,वेगाव १,जळका १ अशी कोरोनाने नोंद केली.
मारेगाव शहरातील प्रभाग क्रमांक १२ मध्ये २ तर प्रभाग क्रमांक ४ मध्ये एका जनाची पॉझिटीव्ह नोंद झाली.