धक्कादायक....
मारेगाव तालुक्यात १४ पॉझिटीव्ह
- मारेगाव शहरात पाच जन बाधीत
मारेगाव : सचिन मेश्राम
मारेगाव तालुक्यात कोरोना संसर्गजन्य विषाणु उग्र रुप धारण करित आहे.बाधीत रुग्णांचा आकडा दिवसागणिक फुगत असतांना आज शुक्रवारला आलेल्या अहवालात मारेगाव तालुक्यात १४ जन पॉझिटीव्ह निघालेत यात तीन महिलांचा समावेश
आहे.मारेगाव शहरातील हा आकडा पाच च्या घरात आहे.दरम्यान आजच्या अहवालात वणी तालुक्यातील चिखलगाव येथील दोघांनी मारेगाव येथे तपासणी केली असता दोघांचा अहवाल पॉझिटीव्ह आलाय त्यामुळे आजच्या आरोग्य विभागाच्या अहवालात बाधितांचा आकडा फुगत १६ झालाय.
मारेगाव तालुक्यात दिवसेंदिवस कोरोना चा प्रादुर्भाव वाढत असल्याचे आरोग्य विभागाच्या अहवालातुन स्पष्ट होत आहे.कोरोना संसर्गजन्य विषाणूने सर्वत्र डोके वर काढलेले असतांना आज मारेगाव शहरातील पाच जन पॉझिटीव्ह आहेत यात एका महिलेचा समावेश आहे.
मारेगाव तालुक्यातील जळका येथील एक ,चोपण ३,मदनापूर एक पुरुष एक महिला व एक महिला,नरसाळा एक महिला , झमकोला १ तर चिंचमंडळ येथे एक जन बाधीत आहे.
मारेगाव तालुक्यात कोरोना संसर्गाचा फैलाव वाढत असतांना शासनाने ठरविलेल्या लॉकडॉउनच्या धोरणा विरोधात व्यापारी तथा छोट्या मोठ्या व्यवसायिकांंनी नाराजी व्यक्त करित दंड थोपटले आहे.शहरात सर्वत्र लॉकडाउनला ठेंगा दाखविण्यात आल्याने आगामी काळात कोरोनाचा संसर्ग रुग्णाच्या रुपात बाधितांचा आकडा फ़ुगला तर आश्चर्य वाटायला नको.परिणामी मारेगाव शहरात प्रशासनाचा काटेकोरपणा थिटा पडलेला दिसतो आहे.