मार्डी चौक येथील विद्युत पुरवठा बाँक्स जळून खाक
आकाश बदकी यांच्या सतर्कतेने जिवित हाणी टळली
पंकज नेहारे
मारेगाव शहरातील मार्डी चौक येथील काल सायंकाळी साडे न ऊ वाजतच्या सुमारास विद्युत पुरवठा बाँक्सला अचानक आग लागल्याने आगीने रूद्र रूप धारण केले असता आगीवर नियंत्रण मिळण्यासाठी मारेगाव शहर युवक काँग्रेस अध्यक्ष आकाश बदकी यांना महिती पडता त्यांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी स्वतःच्या सह खर्चाने पाणी ट्रँक्टर बोलुन या आगीवर पाण्याचा मारा शंकर मेश्राम पिंटू आदे गजानन राठोड शैलेश जुमनाके जावेद शेख व लाईन मन यांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळण्यात आले आजुबाजुच्या दुकानाचे मोठे नुकसान होण्यापासून वाचविण्यात आले यावेळी आकाश बदकी यांचे मारेगाव शहरात कौतुक होत आहे.