पारवा नजिक भिषण अपघात
अमरावती जिल्ह्यातील ३ आंबे व्यवसायिक जागीच ठार
रोहण आदेवार
जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ
पारवा या गावा नजिक स्विफ्ट डिझायर वाहन चालक ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात वाहनावरील नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या बाजूला असलेल्या
निंबाच्या झाडावर वाहन क्रमांक एम एच ४०के आर ७३२५ ही झाडावर आदळल्याने या वाहनात बसुन असलेले तीन जण जागीच ठार झाल्याची माहिती आहे तर एक गंभीर जखमी असल्याने त्याला वसंतराव वैद्यकीय महाविद्यालय येथे भरती करण्यात आले आहे यवतमाळ वरुन पारवा मार्गे पांढरकवडा येथे जात असताना हा अपघात आज दुपारच्या सुमारास हा अपघात झाला या अपघातात ठार झालेले तिन जण ठार एक गंभीर जखमी हे अमरावती जिल्ह्यातील शिरसगाव येथील आंबे व्यवसायिक असल्याची माहिती आहे घटनास्थळी ग्रामीण पोलिस दाखल झाले असून पुढील तपास पोलीस करत आहे.