Type Here to Get Search Results !

यवतमाळच्या साई धन्वंन्तरी कोविड केंद्रासाठी ना.नितीन गडकरी आले धावून

यवतमाळच्या साई धन्वंन्तरी कोविड केंद्रासाठी ना.नितीन गडकरी आले धावून
      
    जिल्हा प्रतिनिधी
प्रतिनिधी: रोहन आदेवार

यवतमाळच्या सत् चिकित्सा प्रसारक मंडळाचे सचिव तथा सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते डाॅ. प्रकाश नंदुरकर यांच्या संयोजनात लवकरच 'साई धन्वंन्तरी कोविड चिकित्सालय' यवतमाळकरांच्या सेवेत दाखल होत आहे.
कोरोना महामारीचा वाढता प्रकोप व चिकित्सालयांवरील ताण पाहता त्यावर उपचार करणारी केंद्र वाढणे गरजेचे आहे. त्यानुसार डाॅ. नंदुरकर यांना हे तात्पुरते केंद्र सुरू करण्यास परवानगी देण्यात आली.
या केंद्राकरिता नागपूर येथील निष्णात  डाॅक्टरांचे पथक उपलब्ध झाले आहे. ऑक्सिजनची व्यवस्था जिल्हा प्रशासनाच्या सहयोगाने होत असून अत्यवस्थ रुग्णाकरिता व्हेंटीलेटरची सोय कशी करावी, हा प्रश्न होता.
आपल्या धडाकेबाज निर्णय व मदत करण्याच्या शैलीसाठी सुप्रसिद्ध असलेले केंद्रीय मंत्री ना. नितीन गडकरी यांना यासंदर्भात हाक देताच त्यांनी ताबडतोब प्रतिसाद दिला. यवतमाळच्या या कोविड उपचार केंद्राकरिता ना. गडकरी यांनी डाॅ. नंदुरकर यांना पहिल्या भेटीतच पाच व्हेंटीलेटर्स उपलब्ध करूनही दिले. याशिवाय आणखी पाच व्हेंटीलेटर्स व सर्व शक्य सहकार्य करणार असल्याचे सांगून आश्वस्त केले. 

या विशेष आपत्तीत यवतमाळकरांसाठी नितीन गडकरी यांची तात्काळ मदत देवदूतासमान ठरली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies