माझ्या मुलीच्या मृत्यूस जबाबदार डाॅक्टरांवर गुन्हे दाखल करुन प्रकरणाची सखोल चौकशी करा. दुर्गा मिश्रा
प्रतिनिधी
रोहन आदेवार
यवतमाळ दि.१९ एप्रिल -:यवतमाळ येथील स्त्री रोगतज्ञ डाॅ.सुरेखा पियुष बरलोटा यांचेकडे गेल्या नऊ महिन्यापासून नियमित उपचार सुरू असताना नवव्या महिन्यात डिलिव्हरी साठी दि.१ मार्च रोजी सौ.बासुरी शैलेश त्रिपाठी हिला दवाखान्यात दाखल केले.मात्र डिलेवरी पूर्वी तिची कोरोना चाचणी करणे गरजेचे असताना अशी कुठलीही चाचणी त्यांनी केली नाही व तिचे बाळंतपण सिझरीन या प्रकारे केले व तिने मुलाला जन्म दिला.मात्र ती उपचार सुरू असताना त्या
रुग्णालयात कोविड पॉझिटीव्ह झाली असे सांगण्यात आले व तिला चार दिवसांनी सुट्टी दिली सुट्टी दिल्यानंतर दि.५ मार्चला घरी येताच काही तासातच तिची प्रकृती अचानक बिघडली व तिला खोकला व घाबरल्या सारखे वाटू लागल्याने परत पुढील उपचारासाठी डाॅ.सुरेखा बरलोटा यांच्या हॉस्पिटल येथे नेले मात्र स्त्री रोग तज्ञ सौ सुरेखा पियुष बरलोटा या दवाखान्यात हजर नसल्याने त्यांचे पती पियुष बरलोटा मनोरुग्ण तज्ञ यांनी उपचार करण्यास सुरुवात केली.काही वेळातच त्यांनी डॉ. महेश शहा यांच्या कोविड सेंटरला पाठविले व तिच्या सिटी स्कॅनच्या रिपोर्ट वरुन कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे सांगितले.विशेष म्हणजे कोणत्याही रुग्णांची शस्त्रक्रिया करायची झाल्यास कोरोणा चाचणी करणे अत्यंत गरजेचे असताना कुठली चाचणी न करता थेट सिजरिन डिलिव्हरी केली या उपचारादरम्यान सौ.बासुरी त्रिपाठी ही बरलोटा हॉस्पिटल मध्येच कोरोना पॉझिटीव्ह झाली का व डॉ.शहा यांच्याकडे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.तसेच डाॅ.महेश शहा यांच्या कोविड केअर सेंटर मध्ये काय उपचार केले हे मात्र गुलदस्त्यातच आहे.कारण कोविड सेंटर मध्ये दैनंदिन या संपूर्ण प्रकाराला डॉ.सौ.सुरेखा पियुष बरलोटा (स्त्री रोग तज्ञ) व डॉ.पियुष बरलोटा (मनोरुग्ण तज्ञ) हे जबाबदार असून त्यांच्यावर सौ.बासुरी शैलेश त्रिपाठी यांच्या मृत्यूस जबाबदार आहे.हा कोरोणा मुळे मृत्यू नसुन माझ्या मुलीचा कोरोणाने मृत्यू नसुन डाॅ.सुरेखा बरलोटा,डाॅ.पियुष बरलोटा व डाॅ.महेश शहाच्या संगनमताने केलेला खुनच आहे असा आरोप दुर्गा मिश्रा यांनी पत्रकार परिषदेत केला.पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले कि
जर तिला कोरोना होता तर तिला भेटण्यास नातेवाईकांना मुभा कशी देण्यात आली होती.जर तिला कोरोना होता तर तिला भेटायला स्त्री रोग तज्ञ सुरेखा पियुष बरलोटा या वारंवार कोविड केअर सेंटर मध्ये कश्या भेटण्यास येत होत्या.तसेच त्या कुठलीही सुरक्षा जशी पी.पी.ई किट,हॅन्डग्लोज न वापरता तिची तपासणी करत होत्या.कोरोना नियमावली बाबत खाजगी कोविड केअर सेंटर व शासकीय कोविड सेंटरला वेगवेगळे नियम आहेत का यावरून असा प्रश्न चिन्ह निर्माण होते.तसेच कोरोना चाचणी व एच.आय.व्ही चाचणी केल्या गेली नाही.ज्या वेळी तिला उपचारासाठी व डिलेवरीसाठी बरलोटा यांच्या हाॅस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल केले असता त्या ठिकाणी लिफ्ट सुद्धा बंद असल्याने दोन मजली इमारत त्या गरोदर महिलेला पायऱ्या चढत वर बोलविण्यात आले.जर ती कोरोणा पाॅझिटीव्ह होती तर तिने जन्म दिलेले बाळ याला कोरोणाचे कोणतेही लक्षण का नाही.जर तिला कोरोणा होता तर तिच्या जवळ असलेल्या नातेवाईकांना व वयोवृद्ध असलेल्या आजी आईला कोरोणाचे कोणतेही लक्षण का नाही.डॉ.सुरेखा पियुष बरलोटा यांच्या रुग्णालयात यापूर्वीही पाच घटना घडल्या असून त्यांच्या डॉक्टरेट पदवी वरच संशय निर्माण होत असून त्यांच्या शैक्षणिक पात्रतेची संपूर्ण चौकशी करावी करण्यात यावी.त्यांचा हातुन अनेक असे गंभीर प्रकार घडले असुन काही उघडकीस आले तर काही पैशांच्या जोरावर दडपण्यात आले.करिता त्यांच्या पदवीची सखोल चौकशी करण्यात यावी.डाॅ.शहा हाॅस्पिटल मध्ये उपचाराचे बिल २,२५५०० व औषोधोपचाराचे बिल १,२४२९२+ इतर ठिकाणाहून ६०००० रु.औषधी आणली असुन हि औषधी रुग्णाला लावल्या कि नाही लावली हा दैनंदिन उपचाराच्या अहवालातुन उघड होऊ शकतो मात्र उपचाराचा दैनंदिन अहवाल मागितला असता तो देण्यास स्पष्ट नकार दिला.याबाबत जिल्हा शल्य चिकित्सक अधिकारी,मा.जिल्हाधिकारी साहेब योग्य ती दखल घेऊन त्वरित कारवाई करतील अशी मागणी मृतकाची आई व भारतीय नारी रक्षा संघटना यांचे वतिने करण्यात येत आहे.यावेळी पत्रकार परिषदेला मृतकाची आई दुर्गा मिश्रा,विनोद दोंदल,सुकांत वंजारी, सुधीर कैपिल्यवार आदी उपस्थित होते.