राज्यातील दहावीच्या परीक्षा रद्द; शिक्षणमंत्र्यांची घोषणा
मुंबई: दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत तर बारावीच्या परीक्षा लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत. बारावीच्या परीक्षा मे महिन्याच्या अखेरीस घेण्याचे प्रयत्न राज्य सरकार करत आहे.
शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी हा निर्णय ट्विटरवरून जाहीर केला. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचं लक्षात घेवून दहावीच्या विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे निकाल जाहीर करण्यात येणार आहे. निकाल कसा तयार करायचा याबाबतचे निकष लवकरच जाहीर करण्यात येतील.