.
डॉ.गजानन कोवे यांची एक्झिट
- वैद्यकीय क्षेत्रात शोककळा
मारेगाव : सचिन मेश्राम
मागील अनेक वर्षापासून मारेगाव स्थित डॉ.गजानन दयाराम कोवे (३८) यांचे आज गुरुवारला अल्पशा आजाराने नागपुर येथे उपचारा दरम्यान निधन झाले.त्यांच्या निधनाने मारेगाव शहरासह वैद्यकीय क्षेत्रात पुरती शोककळा पसरली आहे.
मागील दहा वर्षापासून मारेगाव येथील मार्डी रोड स्थित खाजगी दवाखान्यात नियमित प्रँक्टीस असायची.राळेगाव तालुक्यातील (पेरका) सावंगी हे मुळ गाव असलेल्या डॉ.गजानन कोवे यांनी मागील दहा वर्षापूर्वी पासुन मारेगाव येथे खाजगी दवाखाना सुरु केला होता.मारेगाव येथील नागरिकांशी डॉ.कोवे एकरूप होत सर्वांना आपलेसे केले होते.शांत व निकोप स्वभावाने त्यांनी मारेगाव शहरात वेगळाच ठसा उमटविला होता.
मागील आठवड्यात प्रकृतीत कमालीचा त्रास होत असल्याने वणी येथे उपचार करण्यात आले.त्यानंतर प्रकृतीत सुधारणा होत असतांना बुधवारला अचानक प्रकृती बिघडल्याने वणी येथे डॉ.कोवे यांना दाखल करण्यात आले.प्रकृतीत कमालीची अस्वस्थता निर्माण झाल्याने पुढील उपचारार्थ नागपुर येथे दाखल केले.नागपुर येथे त्यांच्यावर उपचार सुरु असतांना गुरुवारला सकाळी पाच वाजताचे दरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.त्यांच्या पश्चात आई,एक भाऊ,दोन बहिणी,पत्नी व एक मुलगा असा आप्तपरिवार आहे.आज सायंकाळी पाच वाजताचे दरम्यान मारेगाव येथे डॉ.कोवे यांच्यावर अंतीम संस्कार करण्यात येणार असल्याची माहिती कुटुंबियांनी दिली.