धक्कादायक...
गाडेगाव ला घेतले कोरोनाने कवेत
तब्बल २७ जन पॉझिटीव्ह
- मारेगाव तालुक्याने केले शतक पार
मारेगाव : सचिन मेश्राम
मारेगाव तालुक्याला कोरोना चांगलाच विळखा घातला असुन " एल्गार " न्यूज नेटवर्क ला काही क्षणापूर्वी प्राप्त झालेल्या माहितीनुसार मारेगाव तालुक्यात आज दि.१४ एप्रिल रोजी ३० जन बाधीत निघालेत.यात तालुक्यातील गाडेगाव येथे तब्बल २७ जन पॉझिटीव्ह निघाल्याने सर्वत्र भितीदायक वातावरण निर्माण होत आहे.
मारेगाव तालुक्यात कोरोनाने पाय पसरने कायम ठेवत आज बाधितांचा उच्चांक मोडत तालुक्यातील गाडेगाव येथील तब्बल २७ जन बाधीत केले.त्यामुळे सर्वत्र भितीदायक वातावरण निर्माण झाले आहे.मारेगाव तालुक्यात एकाच गावातील सर्वाधीक बाधीत होण्याची ही पहिलीच वेळ असल्याने तालुक्याची चिंता वाढली आहे.
दरम्यान काही वेळापुर्वी प्राप्त झालेल्या अहवालात मारेगाव तालुक्यात ३० जन बाधीत निघाले.यात २७ जन गाडेगाव येथील असुन इतर तीन जणांच्या गावाची माहिती प्राप्त होवू शकली नाही.
परिणामी दिवसागणिक मारेगाव तालुक्यात आकडा फुगत असतांना अँक्टिव रुग्णाने शतक गाठले आहे.दररोज वाढत असलेल्या बाधीत रुग्णाने तालुकावासीयांची चिंता गडद केली आहे.