कोरोना...
मारेगाव येथे एक जन पॉझिटीव्ह
मारेगाव: सचिन मेश्राम
मारेगाव तालुक्यात कोरोना संसर्ग थांबण्याचे नाव घेत नाही.दररोज आरोग्य विभागात प्राप्त होणार्या अहवालात मारेगाव येथे आज बुधवार ला एक जन पॉझिटीव्ह निघाल्याने कोरोनाचा शिरकाव कायम ठेवला आहे.
कोरोना संसर्गाने मारेगाव तालुक्यात आजतागायत पाठलाग कायम ठेवला.शहरातील प्रभाग क्रमांक नऊ मधील युवक पॉझिटीव्ह निघाला.सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतांना मारेगाव तालुक्याने आजतागायत पन्नास चा उंबरठा गाठला आहे.येणार्या काळात ही साखळी मोडण्यासाठी खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासना कडुन करण्यात आले आहे.