मार्डी येथील दारू दुकानावर छापा
- यवतमाळ पथकाची कारवाई
- अवैद्य विक्री करतांना सहा जन ताब्यात ?
मारेगाव : सचिन मेश्राम
महाराष्ट्रात कोरोनाचे संकट घोंगावत असतांना लॉकडाउनचे नियम धाब्यावर बसवित मारेगाव तालुक्यातील मार्डी येथे खुलेआम अवैद्यरित्या दारु विक्री सर्वश्रुत होती.मागील अनेक दिवसापासून हा गोरखधंदा राजरोसपणे सुरु असतांना आज १४ एप्रिल रोजी संध्याकाळी नऊ वाजताचे सुमारास यवतमाळ येथील पथकाने छापा टाकीत रंगेहाथ काही जनांना ताब्यात घेवुन दारुच्या पेट्या जप्त केल्याने अवैद्य व्यवसायात पुरती खळबळ उडाली आहे.
सर्वत्र कोरोना संसर्गजन्य विषाणुचा फैलाव होत असतांना शासनाने लॉकडाऊण करित दारु दुकाने बंद केले. मारेगाव तालुक्यातील मार्डी येथील अवैद्य दारु विक्री करण्यात कमालीचा हातखंडा असलेल्या दारु अनुज्ञप्ती धारकाने कोरोना काळात थेट दुकानातून अवैद्य दारुविक्री करित प्रशासनास आव्हान दिले.मार्डी येथे दारुची विक्री करित असतांना यवतमाळ येथील पथकाने आज बुधवार ला छापा टाकून दारूच्या पेट्या सह काहींना ताब्यात घेतल्याची माहिती असुन वृत्त लिहित असतांना कारवाईची प्रक्रीया सुरु होती.परिणामी किती पेट्या जप्त केल्यात व कुणाला ताब्यात घेतले याची अधिकृत माहिती प्राप्त होवू शकली नाही.मात्र मार्डी येथील कारवाईने अनेकांचे धाबे दणाणून पुरती खळबळ उडाली आहे.
मार्डी येथे कारवाई दरम्यान सोसाट्याचा वारा,वीजपुरवठा खंडीत व वातावरणात कमालीचा गारवा असताना आजच्या भल्या मोठ्या कारवाईने चर्चा मात्र गरमागरम आहे.