बोटोणी येथे कोविड१९ कोरोना लसीकरण शिबीर आयोजित
जयप्रकाश वनकर
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता केंद्र व राज्य शासनाने लसीकरणाला मोठ्या प्रमाणात सुरुवात केली त्या अनुषंगाने मारेगाव तालुक्यातील बोटोणी येथील आज दि. ५ एप्रिल २०२१ ला लसीकरण शिबीर आयोजित करण्यात आले असून ४५वर्षा वरील सर्व नागरिकांना कोविड लस टोचून घेण्याचे आवाहन ग्रामपंचायत तथा आरोग्य विभागाकडुन करण्यात आले आहे.
कोरोनाचा वाढता उद्रेक सपूर्ण महाराष्ट्रा सह देशात कोरोनाची सख्या दिवसागणिक वाढताना दिसत आहे व ग्रामीण भागात वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने ग्रामीण भागात शिबीर आयोजित करून नागरिकांना लस देण्याचे काम हाती घेतले आहे. बोटोणी येथील जि. प.शाळा येथे शिबीराचे आयोजन करण्यात आले असून४५वर्षा वरील नागरीकांनी सदर शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहन नवनिर्वाचित सरपंचा सुनिता जुमनाके व उपसरपंच प्रविण वनकर तर आरोग्य कर्मचारी सोनाली पाथोडे यानी केले आहे.