भूमीपुत्र धावला जन्मभूमीच्या मदतीला !
सहाय्यक समाजकल्याण आयुक्त डॉ.सचिन मडावी यांनी दिली मारेगाव तालुक्यासाठी रुग्णवाहिका भेट
मारेगाव प्रतिनिधी
दिनांक १९ एप्रिल रोजी मारेगाव येथील एका महिलेचा मृतदेह रुग्णवाहिका न मिळाल्यामुळे घनकचऱ्याच्या गाडीत नेण्यात आला.ही बाब माणुसकीला काळिमा फासणारी होती. माणूस मेल्यानंतरही त्याच्या मृतदेहाची एवढी फरफट होत आहे.ही बातमी दुसऱ्या दिवशी आली
आणि मारेगावचे भूमिपुत्र असलेले सध्या बीड येथे सहाय्यक आयुक्त ,समाज कल्याण विभाग या पदावर असणारे डॉ.सचिन मडावी यांच्या मनाला ही बातमी चटका लावून गेली .त्यांनी तेव्हाच ठरविले की आपल्या तालुक्यातील रुग्णवाहिका घ्यायची .मात्र सध्या कोरोना च्या वातावरणात कोणीही रुग्णवाहिका विकायला तयार होत नव्हते.तेव्हा त्यांनी एका खाजगी दवाखाण्या कडून रुग्णवाहिका विकत घेण्याचे ठरवले त्यांनी रुग्णवाहिका विकत घेऊन त्यांनी आपल्या स्व गांवी रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली आहे
दिनांक २ मे २०२१ पासून ही रुग्णवाहिका मारेगाव तालुक्याती रुग्णांच्या सेवेत दाखल होणार आहे.
ही सेवा २४ तास उपलब्ध होणार आहे.
कुठल्याही रुग्णाला गरज पडल्यास त्यांनी खालील खालील क्रमांकावर संपर्क साधावा.
संपर्क --
श्री.शंकरराव मडावी (अध्यक्ष)
बिरसा फाऊंडेशन, मारेगाव
लखु तेलंग - 9423613635
आकाश भेले- 9404846714