महा डिजीटल मिडीया असोसिएशनच्या वतिने पोलीस अधिक्षकांना निवेदन
पत्रकारांवरिल खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक यांच्या वर कारवाईची मागणी
मारेगाव वार्ता
जिल्हा प्रतिनिधी:रोहन आदेवार
यवतमाळ दि.२९ एप्रिल -: पत्रकारिता लोकशाहीचा चौथा स्तंभ समजल्या जातो या पत्रकारितेच्या माध्यमातून भारतात अनेक शोषित पीडितांना आपल्या लेखणीतून वाचा फोडण्याचे व न्याय देण्याचे काम पत्रकार करतो.मात्र गेल्या काही वर्षांपासून पत्रकारांची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न सातत्याने होत असून दिवसेंदिवस पत्रकारावरील हल्ले,पत्रकारावर खोटे गुन्हे दाखल करणे हे नित्याचेच झाले आहे.
असाच प्रकार राळेगाव येथील पत्रकारांसोबत घडला असून त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रताप एका पोलीस
उपनिरीक्षक कडून करण्यात आला.एका प्रकरणात राळेगाव येथील उप पोलीस निरीक्षक श्री.दिलीप पोटभरे यांनी रमेश सुधाकर शिवरकर रा.वरुड ता.राळेगाव जि.यवतमाळ अवधूत महाराज मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थेचे अध्यक्ष यांना अश्लील शिवीगाळ करणे व भाऊराव दमडु शिवरकर व इतर दोन यांच्याशी संगनमत करून रमेश शिवरकर यांच्या न्याय व हक्कापासून वंचित केल्याप्रकरणी फिर्यादी रमेश शिवरकर यांनी जिल्हा पोलीस अधिक्षक यांना तक्रार केली या तक्रारीच्या व त्यांनी दिलेल्या ओ.सी.च्या अनुषंगाने पत्रकार तथा महा डिजीटल मिडीया असोसिएशनचे तालुका अध्यक्ष स्वप्निल वटाणे यांनी रमेश शिवरकर यांना न्याय मिळवून देण्याच्या उद्देशाने बातमी प्रकाशित केली.याचाच मनात राग धरून पोलीस उपनिरीक्षक श्री.पोटभरे यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत आपल्याच पोलीस स्टेशन मध्ये पत्रकार स्वप्नील वटाणे व प्रकाश खुडसंगे यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले आहे.हे गुन्हे आकसापोटी केल्याने हे गुन्हे त्वरित मागे घ्यावे तसेच संबंधित उप पोलीस निरीक्षक श्री.दिलीप पोटभरे यांची चौकशी करून योग्य ती कारवाई करावी अशी मागणी महा डिजीटल मिडीया असोसिएशनच्या वतिने करण्यात आली आहे.पोलीस अधिक्षक यांना निवेदन सादर करतांना महा डिजीटल मिडीया असोसिएशनचे महाराष्ट्र राज्य प्रदेश संघटक तथा एस.एम.न्युजचे मुख्य संपादक सुकांत वंजारी,तालुका अध्यक्ष तथा म-मराठी संपादक मकसुद अली,एम.एच.२९ न्युजचे मुख्य संपादक प्रा.मोहसिन सय्यद आदी उपस्थित होते.