कोरोनाच्या भीतीमुळे घरीच अंगावर ताप शेकने सुरू
मारेगाव वार्ता
रोहन आदेवार
जिल्हा प्रतिनिधी
मारेगाव: यवतमाळ जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असताना त्याचा परिणाम मारेगाव तालुक्यातही दिसत आहे. मारेगाव तालुक्यात सर्व खेडे गावात ताप, सर्दी,अंगदुखीसह खोकल्याचे रुग्ण घराघरात फनफणत असल्याचे दिसून येते आहे. खेड्यातील रुग्ण अशा स्थितीत घरगुती उपायवार भर देवून घरीच इलाज करीत असल्याचे दिसुन येत आहे.
सध्या मारेगाव तालुक्यातील खेड्यामध्ये तापाची साथ असूनही रुग्ण उपचार करण्यास तयार नाही. कोरोना टेस्ट केली व अहवाल पाँजिटिव आला तर रुग्णालयात भरती व्हावे लागते. या भीतीने रुग्ण तपासणीकरिता न जाता अंगावर ताप शेकने पसंत करत असल्याचे दिसून येते आहे. त्यामुळे येत्या दिवसात संबधीत गावात कोरोना संसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येणार नाही?
साध्या शिंका यायला सुरुवात झाली तर मनात शंका घर करतात. सर्दी आणि खोकला झाला तर भीतीत भर पडते आणि ताप आला तर कुठेतरी आपण कोणाच्या संपर्कात तर आलो नाही ना, याचा विचार सुरु होतो. याच कारणाने अनेक जण अंगदुखी ताप, सर्दी, खोकला झाला तरी ताप अंगावरच शेकुन काढत आहे. एकीकडे सोशल मिडियापासून कोरोनावर नीट उपचार होत नसल्याची ओरड कोरोना पेंशन्ट कडून होत असल्याने त्यामुळे स्वत:च्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे वाटुन घरच्या घरी इलाज करत असल्याचे दिसून येते आहे. .
तालुक्यामध्ये बहुतांशी गावामध्ये या साथीच्या तापाचा फैलाव होत असून, नक्की सर्दी, ताप आहे की कोरोनाची लक्षणे
याबाबत संभ्रमव्यवस्था निर्माण झाली आहे. तर काही गावात रुग्ण ताप सर्दीच्या गोळ्या खाऊन घरीच अंगावर बिमारी शेकत असल्याने अनेक रुग्ण दगावत आहे.
गेल्यावर्षी ज्या पद्धतीने प्रशासन यंत्रणा काम करीत होती, तशी यंत्रणा आता काम करताना दिसत नाही. त्यामुळे आकडेवारी वाढत चालली आहे. पूर्वी कोरोना रुग्ण आढळला की त्याला व त्याच्या संपर्कात आलेल्याना कोरोनटाईन केले जात होते. मात्र आजच्या घडीला कोरोना रुग्णाच्या संपर्कातील अनेक व्यक्ती बिनधास्तपणे बाहेर फिरताना दिसत आहेत. तसेच सामाजिक कार्यक्रमात ही उपस्थिती साठी प्रशासनाने आकडा घोषित केला आहे मात्र हा आकडा केवळ कागदावरच दिसत आहे.
घरघुती उपचारावर भर
आता अनेक जण घरच्या घरीच उपचार करीत आहे. विविध वनस्पतींचा काढा, हळदीयुक्त दूध, निंबू पाणी, मिठाच्या पाण्याचे गुळल्या. अद्रकाचा चहा घेण्यावर नागरिकांचा भर आहे. घरातील एक जण आजारी पडला की दुसराही आजारी पडतो. त्यामुळे कोरोनाची धास्ती वाढत आहे. अशा स्थितीत नागरिकांनी लक्षणांना न घाबरता थेट डॉक्टरांचा सल्ला घेवून उपचार करण्याची गरज आहे.