मारेगाव तालुक्यात कोरोनाचा चढता आलेख...
तालुक्यात दहा ..शहरात पाच जन पॉझिटीव्ह
- तालुक्यात कोरोनाचा विळखा घट्ट
मारेगाव: सचिन मेश्राम
मारेगाव तालुक्यात कोरोना संसर्गजन्य विषाणुने विळखा घातला आहे.दिवसागणिक वाढत असलेल्या रुग्णामुळे तालुक्यात चिंतेचे सावट आहे.आज मंगळवार ला प्राप्त अहवालात मारेगाव शहरात पाच जन तर ग्रामिण भागात पाच जन बाधीत असल्याची नोंद झाली.परिणामी यात चार महिलांचा समावेश आहे.
मारेगाव तालुक्यात कोरोना संसर्गजन्य विषाणुने पाय पसरवीने बर्यापैकी सुरु केले आहे.तालुक्यात व शहरात रोजच्या फुगत असलेल्या आकडेवारीने अनेकांच्या मनात धास्ती पकडली आहे.
आज मंगळवार ला आरोग्य विभागाच्या अहवालात तालुक्यातील पांढरकवडा येथे दोन महिला,गाडेगाव येथे एक पुरुष,घोडदरा येथील दोन पुरुषांचा समावेश आहे.
यासोबत मारेगाव शहरातही कोरोना बाधितांचा आकडा फुगत आज पाच जणांची नोंद आहे.यात प्रभाग क्रमांक सहा मध्ये ४ जन असुन बाधितात दोन महिला व दोन पुरुषाचा समावेश आहे तर प्रभाग क्रमांक पाच मधील एका पुरुषाचा समावेश आहे.
दिवसेंदिवस मारेगाव तालुक्यात वाढत आसलेल्या रुग्णांमुळे सर्वत्र चिंतेचे सावट निर्माण होत आहे.