मारेगाव येथे बाबासाहेबांना अभिवादन
मारेगाव : सचिन मेश्राम
भारतीय घटनेचे शिल्पकार ,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंती निमीत्त मारेगाव येथे तमाम उपासक उपासिकांनी अभिवादन केले.
माजी पोलिस पाटील तात्याजी चिकाटे यांनी निळ्या ध्वजाचे तर हेमंत नरांजे यांनी पंचशिल ध्वजाचे ध्वजारोहण करुन उपस्थितांनी मेणबत्ती,अगरबत्ती प्रज्वलीत करुन सामुहीक बुद्धवंदना घेऊन डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.याप्रसंगी धम्मराजिका बुद्ध विहारात बुद्ध रुपाचे पूजन करुन सामुहीक बुद्ध वंदना घेण्यात आली.
याप्रसंगी खालीद पटेल,उदय रायपुरे,दीपक डोहणे,गौरव चिकाटे,गजानन चंदनखेडे,विप्लव ताकसांडे,रवी तेलंग,लक्ष्मीकांत तेलंग,विलास रायपुरे,खुशाल काटकर,घनश्याम गजभीये,बंटी बाभळे,ज्ञानेश्वर धोपटे,अनिल खैरे, मानिकचंद दारुंडे,विनय गजभीये,राजू दारुंडे यांच्या सह तमाम उपासक तथा उपसिकेंची उपस्थिती होती.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन गौतम मालखेडे यांनी केले.