जिल्ह्यात 1163 जण पॉझेटिव्ह ; 1011 कोरोनामुक्त
जिल्ह्याबाहेरील चार मृत्युसह एकूण 20 मृत्यु
जि.प. आरोग्य विभागाच्यातर्फे प्राप्त अहवालानुसार शनिवारी एकूण 6042 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 1163 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 4879 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 5972 रुग्ण ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह असून यापैकी रुग्णालयात भरती 2858 तर गृह विलगीकरणात 3114 रुग्ण आहेत. तर जिल्ह्यात एकूण 1073 मृत्युची नोंद आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यु झालेल्यांमध्ये यवतमाळ शहरातील 66, 70, 49 वर्षीय पुरुष आणि 80, 83 वर्षीय महिला, यवतमाळ तालुक्यातील 45 वर्षीय पुरुष, आर्णि येथील 80 वर्षीय पुरुष, कळंब तालुक्यातील 68 वर्षीय महिला, बाभुळगाव तालुक्यातील 85 वर्षीय पुरुष, हिंगणघाट (जि. वर्धा) येथील 60 वर्षीय पुरुष, माहूर (जि. नांदेड) येथील 55 वर्षीय महिलेचा समावेश आहे. जिल्ह्यातील डेडिकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर मध्ये मृत्यु झालेल्यांमध्ये पांढरकवडा येथील 30, 60 वर्षीय पुरुष व 40 वर्षीय महिला, दारव्हा येथील 75 वर्षीय पुरुष आणि उमरखेड येथील 85 वर्षीय पुरुष तर खाजगी रुग्णालयात मृत झालेल्यांमध्ये यवतमाळ येथील 49 वर्षीय पुरुष, उमरखेड येथील 52 वर्षीय पुरुष, नांदेड येथील 62 वर्षीय महिला आणि नागपूर येथील 46 वर्षीय पुरुष आहे.
शनिवारी पॉझेटिव्ह आलेल्या 1163 जणांमध्ये 653 पुरुष आणि 510 महिला आहेत. यात यवतमाळ येथील 371 पॉझेटिव्ह रुग्ण, दिग्रस 163, वणी 147, उमरखेड 90, पांढरकवडा 67, झरी 49, दारव्हा 45, घाटंजी 45, मारेगाव 40, बाभुळगाव 36, महागाव 23, नेर 22, आर्णि 20, कळंब 16, पुसद 12, राळेगाव 8 आणि इतर शहरातील 9 रुग्ण आहे.