मार्डी प्रकरण अपडेट ...
४३ लाखाच्या दारूसह साडेतीन लाख जप्त
- तालुक्यात सर्वात मोठी कारवाई
- तब्बल १५ तासाची कारवाई
- गोपनीय माहितीच्या आधारे सायबर सेल व एस.पी.पथकाचा छापा
मारेगाव : सचिन मेश्राम
मारेगाव तालुक्यात लॉकडाऊण व शासकीय सुट्टीत मोठ्या प्रमाणात मार्डी येथील अनुज्ञप्ती धारकाने अवैद्य दारु विक्रीचा खुलेआम व्यवसाय सुरु ठेवून शासनाच्या नियमाला बगल देत गोरखधंदा चालविला.
याबाबतची गोपनीय माहिती सायबर सेल व एस.पी.पथकाला मिळताच दि.१४ एप्रिल रोजी रात्री नऊ वाजता मार्डी येथील दारू दुकानावर छापा टाकुन ४३ लाखावरील देशी विदेशी दारू सह साडेतीन लाख रुपये जप्त करीत सहा जनांना अटक केली.मारेगाव तालुक्यातील सर्वात मोठ्या कारवाईने अवैद्य व्यवसायिकांचे धाबे दणाणले आहे.
मारेगाव तालुक्यातील मार्डी येथील अधिकृत दारु विक्रेत्याचा अवैद्य दारु विक्रीचा गोरखधंदा हा कायम तोंडपाठ आहे.अलिकडच्या कोरोना संसर्गाने सर्वत्र हलबतता असतांना सर्वत्र दारु दुकाने बंद असतानाही येथे मात्र खुलेआम दारुची विक्री नेहमीच होत होती. याबाबतची गोपनीय माहिती यवतमाळ येथील सायबर सेल व एस.पी.पथकाला मिळाली.त्यामुळे या पथकाने दि.१४ एप्रिल बुधवारला शिस्तबद्ध व सुनियोजित व्युव्हरचना आखून मार्डी येथील जयस्वाल यांच्या दारु दुकानावर रात्री ९ वाजताचे दरम्यान छापा टाकुन देशी दारुच्या ७३६ पेट्या व २०० विदेशी पेट्या असा जवळपास ४३ लाखावरील दारु सह साडेतीन लाख रुपये जप्त केले.
या कारवाईत वेदांत परमानंद जयस्वाल रा.मार्डी,अविनाश पाटील मार्डी,मंगेश आडसकर पिसगाव,मुकेश कांबळे मार्डी,अविनाश नगराळे बामर्डा,वैभव रस्से पिसगाव यांचेवर ६५ (ई )(ह)६७,८३,१०८ दारूबंदी कायदा १८८,२६९,२७०,आपिसी,३व ४ आय.पी.सी.अंतर्गत गुन्हे दाखल करुन अटक केली.सदरील कारवाई पोलिस निरीक्षक किशोर जुनगरे,सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल पुरी,पो.ऊ.नि.योगेश रंधे ,कविश पाळेकर,उमेश पिसाळकर,सुधीर पिदुरकर,बबलू चव्हाण,सलमान शेख,सैजाद शेख,पंकज पातूरकर यांनी केली.