कोरोना अपडेट ...
आज १६ पॉझिटीव्ह
- मारेगाव ०९
मारेगाव : सचिन मेश्राम
कोरोना संसर्गजन्य विषाणुने आज गुरुवार ला १६ आकड्यांची मजल मारली.ग्रामिण भागात सात तर मारेगाव शहरात ०९ जन पॉझिटीव्ह निघालेत.
कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव सर्वत्र वाढत असतांना मारेगाव तालुका यास अपवाद नाही.कोरोना बाधितांच्या आकड्यात भर टाकीत सातत्य कायम ठेवत आज प्राप्त अहवालात मारेगाव तालुक्यात १६ जन पॉझिटीव्ह वर शिक्कामोर्तब झाला.
तालुक्यातील कोलगाव येथे २,धामणी २,मदनापूर १,मार्डी १,वेगाव १ तर मारेगाव शहरातील शांती नगर १,प्रभाग क्रमांक ६ मध्ये २,प्रभाग क्रमांक १३ मध्ये २ प्रभाग चार मध्ये ४ जणांचा समावेश आहे.