ब्रेक दि चेन अंतर्गत १५ मे पर्यंत निर्बंध कायम
मारेगाव वार्ता
जिल्हाप्रतिनिधी
रोहन आदेवार
यवतमाळ, दि. ३० : ब्रेक दि चेन अंतर्गत जिल्ह्यासाठी मार्गदर्शक सूचना निर्गमित केलेल्या आहेत. तसेच सदर कालावधीत राज्यात कलम १४४ (संचारबंदी) लागू करण्यात आली आहे. मुख्य सचिव यांच्या आदेशान्वये १मे च्या सकाळी ७ वाजेपासून ते १५ मे २०२१ च्या सकाळी ७ वाजेपर्यंत ब्रेक दि चेन अंतर्गत घालून देण्यात आलेले निर्बंध कायम करण्यात आले आहेत.
त्यानुसार जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी अमोल येडगे यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५, भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम १८८७ यातील मार्गदर्शक सूचनेनुसार यवतमाळ जिल्ह्याकरीता १५ मे २०२१ च्या सकाळी ७ वाजेपर्यंत ब्रेक दि चेन अंतर्गत घालून देण्यात आलेले निर्बंध कायम केले आहे. तसेच सदर कालावधीत जिल्हाधिकारी कार्यालयाचे १४ एप्रिल, २० एप्रिल व २२ एप्रिल २०२१ अन्वये निर्गमित करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचना दिनांक १५ मे २०२१ च्या सकाळी ७ वाजेपर्यंत लागू राहतील.
सदर आदेश यवतमाळ शहर व जिल्ह्याकरीता शहरी व ग्रामीण भागाकरीता लागू राहतील. जे वरील आदेशांचे उल्लंघन करतील त्यांचेवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५, भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम १८९७, भारतीय दंड संहिता १८६० चे कलम १८८ व इतर संबंधीत कायदे व नियम यांचे अंतर्गत कारवाई करण्यात येईल, असे यवतमाळच्या जिल्हाधिका-यांच्या आदेशात नमुद आहे.
👍👍
उत्तर द्याहटवा