बिरसा क्रांती दल नवापूर तालुका अध्यक्ष पदी राकेश वळवी यांची निवड
प्रतिनिधी:नंदुरबार
नंदुरबार: बिरसा क्रांती दल नवापूर तालुका अध्यक्ष पदी किसन वळवी यांची निवड करण्यात आली आहे. मनोज पावरा नाशिक विभाग प्रमुख आणि अध्यक्ष बिरसा क्रांती दल यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 25 एप्रिल 2021 रोजी झूम मिटींग आयोजित करण्यात आली होती. या झूम मिटींग मध्ये तळोदा तालुका कार्यकारिणी निवड करून जाहीर करण्यात आली. नवापूर तालुका कार्यकारिणी पुढीलप्रमाणे जाहीर करण्यात आली.
तालुका अध्यक्ष राकेश वळवी, उपाध्यक्ष धिरसिंग वसावे, सचिव गिरीष वळवी, सहसचिव प्रशांत वसावे, कार्याध्यक्ष प्रकाश नाईक, कोषाध्यक्ष रजेसिंग वळवी, सल्लागार देवीदास वसावे, संघटक अमरसिंग वसावे या प्रमाणे तालुका शाखा कार्यकारिणी निवड करण्यात आली.
सभेला सुशीलकुमार पावरा कोकण विभाग प्रमुख आणि अध्यक्ष, वसंत पावरा जिल्हाध्यक्ष धुळे व राजेंद्र पाडवी जिल्हाध्यक्ष सांगली बिरसा क्रांती दल इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते. नवनिर्वाचित तालुका पदाधिकारी व सदस्य यांचे मनोज पावरा यांनी अभिनंदन केले आहे व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.