वनपरिक्षेत्र अधिकारी सुनील ताजने यांचे निधन
प्रतिनिधी भास्कर राऊत
वनपरिक्षेत्र अधिकारी सुनील ताजने यांचे निधन
वणी येथील वनपरिक्षेत्र अधिकारी या पदावर कार्यरत असलेले सुनील जगन ताजने वय ४१ वर्षे यांचे वणी येथील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
चंद्रपूर येथे वनविभागात लागल्या नंतर त्यांची पदोन्नतीवर वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणून वणी येथील वन विभागात बदली झाली होती. मनमिळाऊ व मितभाषी असलेल्या सुनील ताजने यांच्या जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केल्या जात आहे. मारेगाव तालुक्यातील चोपण येथील रहिवासी असलेल्या सुनील ताजने यांचे वडील निवृत्त पोलीस पाटील आहे. सुनील ताजने यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी , एक मुलगा आई, वडील व भाऊ असा बराच मोठा आप्त परिवार आहे.