Type Here to Get Search Results !

जिल्ह्यात १३२३ जण पॉझेटिव्ह ; ८०३ कोरोनामुक्त जिल्ह्याबाहेरील एका मृत्युसह एकूण ४५ मृत्यु

जिल्ह्यात १३२३ जण पॉझेटिव्ह ; ८०३ कोरोनामुक्त
 जिल्ह्याबाहेरील एका मृत्युसह एकूण ४५ मृत्यु

यवतमाळ, दि.  २६: जिल्ह्यात गत २४ तासात १३२३ जण नव्याने पॉझेटिव्ह आले असून ८०३ जण कोरोनामुक्त झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. जिल्ह्यात एकूण ४५ मृत्यु झाले. यातील ३३ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात, चार मृत्यु डेडिकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये तर आठ मृत्यु खाजगी रुग्णालयात झाले. सोमवारी झालेल्या एकूण ४५ मृत्युपैकी एक मृत्यु जिल्ह्याबाहेरील आहे.
जि.प. आरोग्य विभागाच्यातर्फे प्राप्त अहवालानुसार सोमवारी एकूण ६१५४ जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी १३२३ जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर ४८३१ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात ६७०३ रुग्ण ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह असून यापैकी रुग्णालयात भरती २७३१ तर गृह विलगीकरणात ३९७२ रुग्ण आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या ४९१३२ झाली आहे.२४ तासात ८०३ जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 41272 आहे. तर जिल्ह्यात एकूण ११५७ मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर १२.५० असून मृत्युदर २.३५ आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यु झालेल्यांमध्ये यवतमाळ शहरातील २५, ४६, ५६, ४२,७८,६५, ५४, ६३वर्षीय पुरुष आणि ४४ वर्षीय महिला, यवतमाळ तालुक्यातील ३६, ३०, ६३, ६९, ४२, ५६ वर्षीय पुरुष व ७० वर्षीय महिला, नेर येथील ३५ वर्षीय पुरुष, आर्णि येथील ३९ वर्षीय पुरुष व ६६ वर्षीय महिला, आर्णि तालुक्यातील ३६ व ६८ वर्षीय महिला, दारव्हा येथील ५५ वर्षीय पुरुष, वणी येथील ६१, ७६ वर्षीय पुरुष व ५२, वर्षीय महिला, राळेगाव येथील ६३ वर्षीय पुरुष, राळेगाव तालुक्यातील ४८ वर्षीय पुरुष, उमरखेड तालुक्यातील ७० वर्षीय पुरुष व ५५ वर्षीय महिला, झरी तालुक्यातील ८५ वर्षीय महिला, पुसद येथील ६० वर्षीय पुरुष आणि आदिलाबाद (आंध्र प्रदेश) येथील ६० वर्षीय महिलेचा समावेश आहे. जिल्ह्यातील डेडिकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर मध्ये मृत्यु झालेल्यांमध्ये दारव्हा येथील ४५वर्षीय महिला, उमरखेड येथील ३६ वर्षीय पुरुष, महागाव येथील ७० वर्षीय पुरुष, पांढरकवडा येथील ६०वर्षीय महिला आहे. तर खाजगी रुग्णालयात मृत झालेल्यांमध्ये यवतमाळ येथील ५३, ४५, ३६ वर्षीय पुरुष, पुसद येथील ६५, ६७, ४५ वर्षीय पुरुष व ७०वर्षीय महिला आणि वणी येथील ४२ वर्षीय महिला आहे.
  सोमवारी पॉझेटिव्ह आलेल्या १३२३ जणांमध्ये ७४४ पुरुष आणि ५७९ महिला आहेत. यात यवतमाळ येथील २८० पॉझेटिव्ह रुग्ण, पुसद १८६, दिग्रस १५७, दारव्हा १३९, पांढरकवडा १३३, वणी ७०, बाभुळगाव ६९, उमरखेड ६१, झरी ५२, कळंब ४६, महागाव ३८, आर्णि ३८, घाटंजी २२, मारेगाव १३, नेर ६, राळेगाव ६, आणि इतर शहरातील 7७रुग्ण आहे. 
सुरवातीपासून आतापर्यंत ३९३०८० नमुने पाठविले असून यापैकी ३८८२०८ प्राप्त तर ४८७२ अप्राप्त आहेत. तसेच ३३९०७६ नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे आरोग्य विभागाने कळविले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies