कोरोना अपडेट ...
मारेगाव तालुका: २४
शहरात आठ जन पॉझिटीव्ह
मारेगाव : सचिन मेश्राम
मारेगाव तालुक्यात कोरोना संसर्गाने आज बुधवार ला पाय पसरने कायम ठेवत तालुक्यात दोन डझनभर ला बाधीत केले.दिवसागणिक वाढत असलेल्या रुग्ना मुळे चिंतेत भर पडत असतांना नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन प्रशासना कडुन करण्यात येत आहे.
मारेगाव तालुक्यात कोरोना बाधितांचा आकडा फुगत असतांना आज बुधवारला तालुक्यात २४ जन पॉझिटीव्ह निघालेत.यात मारेगाव शहरात आठ जन तर ग्रामीण मध्ये १६ बाधित निघाले शहरातील प्रभाग व ग्रामीण भागातील निहाय व आकडेवारी प्राप्त होवू शकली नाही.
संपुर्ण तालुका वेगवेगळ्या आजाराने फणफणत असतांना कोरोना संसर्गाने आपले डोके वर काढीत रोजच्या दुहेरी आकड्याने चिंतेत भर टाकत आहे.आजतागायत मारेगाव तालुक्यातील अँक्टिव रूग्णसंख्या तब्बल २३० वर पोहचली आहे.