मारेगाव येथील डॉ.आंबेडकर चौक बनला अवैध दारुचा पॉईंट
- ६०० रु.इंग्लीश तर २०० ते २५० देशी
- प्रशासनाचे हेतुपुरस्सर दुर्लक्षाचा आरोप
- स्कुटी वाहनातून होतेय सप्लायर्स
मारेगाव: दीपक डोहणे
लॉकडाऊन व संचारबंदीत सर्वत्र काटेकोर अमलबजावणी होत असतांना याला शहरातील डॉ.आंबेडकर चौक अपवाद ठरत आहे.येथे मोठ्या प्रमाणात वधारलेल्या किमतीत देशी विदेशी दारुची खुलेआम विक्री प्रशासनास आव्हान ठरतेय का? असा उपरोधीत सवाल जनतेकडून विचारल्या जात आहे.
कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भावाने शासनाने लॉकडाऊण काटेकोर नियम अमलात आणले.अवघ्या वेळेत बाजारपेठ बंद करीत अमलबजावणील प्रतिसाद मिळत असतांना मारेगाव शहरातील आंबेडकर चौकात अवैद्य दारुचा खप वाढतो आहे.चक्क एक बार मालक चौकात घिरट्या मारत विक्री करित असल्याची माहिती आहे यासाठी स्कुटी वाहनाचा वापर केल्या जात तळीरामाचे चोचले वधारलेल्या भावात पुरविल्या जात आहे.
पोलिस प्रशासनाचा अवैद्य दारु विक्रीला लगाम लावण्यासाठी ग्रामिण भागात जोर कमालीचा वाढला आहे.यापूर्वी ग्राम खेड्यावर छापाही टाकण्यात आला.मात्र मार्डीतील खुलेआम दारु विक्रिवर एस.पी.च्या पथकाने कारवाई करीत मुसक्या आवळल्या होत्या.यात कर्तव्यातील सैलपणा मारेगावचा बहुदा कारणीभूत ठरल्याचा चर्चेने अख्खा तालुका प्रभावित झाला होता हे विशेष.
मारेगाव तालुक्यात छोट्या मोठ्या कारवाईंने ऐन लॉकडाऊणच्या काळात तळीराम पुरते सैरभैर होत असतांना मारेगाव शहरात ठराविक ग्राहकांना चढ्या दराने अवैद्य दारुची विक्री होत आहे.हा गंभीर प्रकार सर्वत्र चर्चील्या जात असतांना बीट जमादारच्या कर्तव्यावर प्रश्नचिन्ह उभे ठाकत आहे.शहरात विक्री होत असलेल्या अवैध दारू विक्रिने शहरात काळीमा फासत आहे.प्रशासनाने यावर गंभीर दखल घेवुन येणार्या पुरवठ्याचे बिंग फोडण्याची गरज निर्माण झाली आहे.परिणामी सर्वत्र कोरोनाचा आलेख वाढत असतांना ज्यादा दराने चोचले पुरवण्यावर भर देणार्या खलनायकावर पोलिस प्रशासन नेमका कसा अंकुश लावतो हा प्रश्न सर्वांसाठी औत्सूक्याचा बनला आहे. यात नेमके कुणाचे हात ओले तर नाही ना? याचीही चाचपणी जनता शब्दात व्यक्त करीत आहे.