डेडिकेटेड कोविड हेल्थ सेन्टर लवकर जनतेच्या सेवेत आमदार संजिवरेड्डी बोदकुरवार
प्रतिनिधी
निखिल मेहता
वणीत कोरोना काळात रुग्णाच्या होणाऱ्या गैरसोयीमुळे आमदार संजिवरेड्डी बोदकुरवार यांच्या प्रयत्नातून कोरोना रुग्णासाठी चालूं असलेलं ग्रामीण रुग्णालय वणी येथिल ट्रामा केअर च्या इमारतीमध्ये सुसज्ज सुविधा
पुर्ण डेडिकेटेड कोविड हेल्थ सेन्टर वणीकरांच्या सेवेत उपलब्ध होण्या करिता मान्यता प्राप्त झाली असुन DCHC चालू करण्याच्या अनुषंगाने वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजिवरेड्डी बोदकुरवार यांच्या मार्गदर्शनामध्ये वणी विश्रामगृह येथे बैठक बोलावून सर्व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना सुचना देण्यात आल्या या सुसज्य रुग्णालयासाठी आवश्यक असलेले बेड,ऑक्सिजन, व्हेंटिलेटर,औषधी,अम्बुलस व आवश्यक डॉक्टर व नर्सेस इत्यादी व्यवस्था करण्याच्या दृष्टीकोनातून आमदार निधी उपलब्ध करणार असे सांगितले.
तसेच ट्रामा केअर येथे चालू असलेले कोविड केअर सेन्टर तात्काळ परसोडा येथील शासकीय निवासी शाळा येथे सुरू करण्याचे निर्देश केले .
यावेळी वणी ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक डॉ.सुलभेवार,तालुका आरोग्य अधिकारी डॉ. कांबळे व इतर अधिकारी उपस्थित होते.
वणी नगर परिषदेतील कल्याण मंडप येथे विलगिकरण कक्ष स्थापन करण्याकरिता सुध्दा यावेळी चर्चा करण्यात आली. यावेळी
आमदार श्री संजिवरेड्डीजी बोदकुरवार(आमदार,वणी विधानसभा),श्री.तारेंद्रजी बोर्डे(नगराध्यक्ष,न.प.वणी),श्री.संजयजी पिंपळशेंडे(सभापती,पं.स.वणी),श्री.दिनकरराव जी पावडे(माजी सरचिटणीस),श्री.गजाननजी विधाते(तालुकाध्यक्ष, भाजपा वणी), कैलास पिंपराडे,दिपक मत्ते , नितीन वासेकर,दिपक पाऊणकर व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.