पुन्हा धक्का...
मारेगाव तालुक्यात ४४ पॉझिटीव्ह
मारेगाव : सचिन मेश्राम
कोरोना संसर्गाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत असतांना आज शुक्रवारला बाधितांचा आकडा कमालीचा फुगत मारेगाव तालुक्यात ४४ वर गेला.गाडेगाव येथे १७ बाधितांची नोंद झाली आहे त्यामुळे वाढत्या रुग्णामुळे चिंतेचे सावट पसरत आहे.
मारेगाव तालुक्यातील कोरोना रुग्णा मध्ये झपाट्याने वाढ होत असल्याने मारेगाव शहरासह ग्रामिण भागात रुग्णाची व्याप्ती वाढत चालली आहे.हे चिंतेचे सावट कायम राहण्याची शक्यता वर्तविंण्यात येत असतांना यावर नियंत्रण मिळविण्याकरिता सुरक्षित आणी सतर्कता बाळगणे हाच पर्याय आहे.
दरम्यान मारेगाव तालुक्यात आज प्राप्त अहवालात ४४ पॉझिटीव्ह निघालेत.यात गाडेगाव येथील बाधितांचा आकडा १७ आहे.कोरोना संसर्गाने गाडेगावला कमालीचा विळखा घातल्याने चिंतेचे सावट गडद होत आहे.मारेगाव शहरासह इतर गावातील बाधीत रुग्णांची आकडेवारी प्राप्त होवू शकली नाही.