विवाहित महिलेची गळफास घेऊन आत्महत्या
म्हैसदोडका येथील घटना
प्रतिनिधी:पंकज नेहारे
मारेगाव तालुक्यापासून १० किलोमीटर अंतरावर असलेल्या म्हैसदोडका येथील विवाहित महिलेने गळाफास घेवून आत्महत्या केल्याची घटना उघडीस आली.
सीमा साई कोसरी (चौधरी) (२०) असे मृतक तरुणीचे नाव आहे. सीमा चा मुक्तन पेठ जिल्हा आदिलबाद येथील साई कोसरी या मुलाशी आंतरजातीय प्रेम विवाह मागील सहा महिन्यापुर्वी झाल्याचे समजते. या दरम्यान तीचे माहेरी नेहमी येणे जाणे करीत असल्याचे ही कळतेय.
तिला कालच तिच्या पतीने म्हैसदोडका येथे आणून सोडले होते. आज सकाळी नेहमी प्रमाणे घरची मंडळी आप आपल्या कामासाठी घरा बाहेर निघून गेले असता, सीमाचे वडील घरी आल्या नंतर घरचा दरवाजा उघडून बघितले असता सिमाचा मृतदेह गळफास घेवून लटकेल्या अवस्थेत दिसून आला. याबाबत पोलीस पाटील यांनी मारेगाव पोलीसांना माहिती दिली.