Type Here to Get Search Results !

मारेगावात वर्षावासची समाप्ती

 मारेगावात वर्षावासची समाप्ती 

      मारेगाव  ( दीपक डोहणे)

           मारेगाव येथील धम्मराजिका बुद्ध विहारात आषाढ पोर्णिमा अर्थात वर्षावास प्रारंभ निमीत्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर लिखित भगवान गौतम बुद्ध व त्याचा धम्म या ग्रंथाचे वाचन सोशल डिस्टन्सींगने करुन भिख्खुनी सुकेशनी यांनी पोर्णिमेचे महत्व विषद केले.मागील तीन महिन्या पासुन १आक्टोंबर अश्विनी पोर्णिमेला वर्षावासाची सांगता करण्यात आली.
बौद्ध धम्मात पौर्णिमेला फार महत्व आहे.कारण तथागत भगवान गौतम बुद्धाच्या जीवनात ज्या ज्या मंगल घटना घडल्या त्या पोर्णीमेलाच घडल्या आहेत.त्यांच्या जीवनात पहिली पोर्णिमा ही आषाढी पोर्णिमा आहे.म्हणुनच या दिवसाचे औचित्य साधून वर्षावासाचा प्रारंभ करण्यात येतो.
     मारेगाव येथील धम्मराजिका बुद्ध विहारात सलग तीन महिने ' भगवान गौतम बुद्ध आणि त्यांचा धम्म ' ग्रंथाचे वाचन करीत सामुहिक बुद्ध वंदना घेण्यात येत होती.वर्षावास च्या सांगता समारोहास विहार परिसरातील पंचशिल ध्वजाचे ध्वजारोहण अनुयायिंनी केले.त्यानंतर असंख्य अनुयायी- अनुयायिंनी बुद्ध रुपाचे पूजन करुन सामुहिक बुद्ध वंदना घेतली.यावेळी खीर वाटप करण्यात आली.
 वर्षावास समाप्तीच्या अनुषंगाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास तलाठी टी.के. खोब्रागडे व आरोग्य सभापती खालीद पटेल यांनी अगरबत्ती आणि मेणबत्ती प्रज्वलीत करित मंडल अधिकारी के.एस.भगत यांनी पुष्पहार अर्पण केले. त्यानंतर सामुहिक बुद्ध वंदना घेण्यात आली.या प्रसंगी नगरसेवक उदय रायपुरे ,अनिल खैरे , दीपक डोहणे , गौरव चिकाटे यांची प्रमुख उपस्थिती होती.वर्षावास समाप्ती करिता अनिता खैरे, शोभा दारुंडे, कमलताई डोहणे, लता वनकर, वंदना रायपुरे , रेखा काटकर , रामटेके ताई, सविता नरांजे , बेबीताई चिकाटे, धोपटे ताई, संगीता मून ,सुनिता चिकाटे यांचे सह अनुयायिंनी पुढाकार घेतला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies