मारेगाव तालुक्यात कोरोना संकट गडद...
मारेगाव सह करणवाडीतील प्रभाग सिल
मारेगाव:दीपक डोहणे
मारेगांव शहरात कोरोणाने हळूहळू आता पाय रोवने सुरू केले आहे. शहरातील व्यापारी कुटुंबासह करणवाडी येथील दोघांना कोरोनाची लागण झाल्याने मारेगाव शहरातील महाकुलकर वाडी व कृष्णा नगरी सह करणवाडी येथील प्रभाग क्रमांक एक व दोन सिल केल्याने नागरिकांत प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
संपूर्ण देशात कडक लाँकडाउन असतांना मारेगाव तालुका हा कोरोना मुक्त होता. त्यामुळे मारेगाव तालुक्यातील जनतेचा वावर मनमोकळेपणाने सुरु होता. लाँकडाऊनचा कडक टप्प्यात नागरिक वेगवेगळ्या चौकात समुहाने वावरत होते. मात्र सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात एक शासकीय कर्मचारी व सिंदी येथील महिला कोरोना पाँझीटिव्ह निघाल्याने नागरिकासह प्रशासनाची पुरती भंबेरी उडाली आहे. प्रशासनाचे सकारात्मक कारवाई करित१६०जणांचे स्वँब घेवुन अहवाल यवतमाळ येथे पाठविला.
परिणामी अहवालातील शेवटच्या टप्प्यातील मारेगाव येथील चार जन तर करणवाडी येथील दोन जन कोरोना पाँझीटिव्ह निघाल्याने तालुक्यातील नागरिकांत गडद संकट निर्माण झाले. दरम्यान मारेगाव शहरातील महाकुलकार वाडी व कृषणा नगरीसह करणवाडी येथील वार्ड क्रमांक एक व दोन सिल करण्यात आला. कोरोनाच्या सावटाने मारेगावात शिरकाव केल्याने कोरोना बांधीतांचा आकडा फुगू नये यासाठी प्रशासन योग्य ती काळजी घेत असले तरी नागरिकांना सजग राहून कोरोनावर मात करण्यासाठी जागृत राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.