मारेगाव तालुक्यात पुन्हा दोन पॉझिटीव्ह
मारेगाव शहराला मात्र दिलासा
मारेगाव : सचिन मेश्राम
मारेगाव तालुक्यात कोरोना संसर्गजन्य रोगाचा कहर कायम आहे.आज मंगळवारला तालुक्यातील चिंचमंडळ व हिवरी येथे प्रत्येकी एक बाधित रुग्णाचा अहवाल प्राप्त झाला आहे.यात मारेगावकरांसाठी दिलासादायक बातमी आहे.तुर्तास एकही रूग्ण आज नाही.
मारेगाव तालुक्यात कमी जास्त प्रमाणात कोरोना बाधित रुग्णाचा आकडा वाढतो आहे.कोरोना संसर्ग डेरे दाखल मारेगाव तालुक्यात पोहचला असतांना कायम स्वरुपी थांबण्याचे नाव घेत नाही आहे.त्यामुळे तालुक्यातील नागरिकांची धाकधुक कायम आहे.दरम्यान आज आलेल्या अहवालात कोरोनाने चिंचमंडळ व हिवरी वर ठपका ठेवला आहे.