Type Here to Get Search Results !

धक्कादायक..मारेगाव तालुक्यातील कोरोनाचा दुसरा बळी

धक्कादायक..
मारेगाव तालुक्यातील कोरोनाचा दुसरा बळी
मारेगाव  : सचिन मेश्राम 
  
मारेगाव तालुक्यातील कोर्थुला येथील हरिदास ढाकणे यांना पंधरा   दिवसा पुर्वी अर्धांगवायूचा आजार जडल्याने त्यांना पुढील       उपचारासाठी मेघे सांवगी येथील दाखल केले होते. तत्पूर्वी  त्यांची            कोरोना तपासणी करण्यात आली होती. यात ते पॉझिटीव्ह निघाले होते. हरिदास चंपत ढाकणे  वय ६५ रा कोर्थुला ता. मारेगाव  यांचेवर कोरोना उपचार मेघे सावंगी येथे सुरु असताना  शनिवार दि. २६ सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजताच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मावळली. त्यांच्या पश्चात पत्नी व  आपत्य परिवार आहे.
मारेगाव शहरात काही दिवसा आगोदर एका कृषी संचालकाचा    कोरोना मुळे मुत्यु झाला होता.
कोरोना संसर्गजन्य रोगाने मारेगाव तालुक्यात शिरकाव केला तेव्हा पासुन कमी जास्त प्रमाणात बाधितांच्या आकड्यात भर पडत आहे. 
   तालुक्यातील एकुण ऐक्टिव ची आता १६ च्या घरात पोहचली आहे.
 दिवसेंदिवस वाढत असलेल्या कोरोना बाधितांचा आकडा  प्रशासनासह नागरिकांना हतबल करित आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies