पोलीस अधीक्षकाच्या डोळ्यात अंजन घालण्याचा धक्कादायक प्रकार
🔸११७० रुपयाची केवळ मारेगाव पोलिसांची कार्यवाही
🔸अन् एलसीबीची च १८२८०रुपयासह ७ अरोपी अटकेत
🔸मारेगाव पोलिसाचा लपंडाव उघडकीस
जिल्ह्यातील अवैध व्यवसायावर आळा घालण्याकरता पोलीस अधीक्षकह्यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांसह पोलीस निरीक्षक यांना पोलीस स्टेशन अंतर्गत अवैध व्यवसाय तात्काळ बंद करण्याचे आदेश दिले होते. मात्र मारेगाव पोलिसाकडून या आदेशाला केराची टोपली दाखविल्या गेल्याचे चित्र एलसीबीच्यां कार्यवाहीने उघड केले.३ सप्टेंबर रोजी दुपारी १वाजता दरम्यान शहरातील शासकीय गोडाऊन जवळ कारवाई करत सहा आरोपीना अटक करत १८,२८० रुपयाचा मुद्देमाल रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केला. त्यामुळे या कारवाईकडे तालुका वासियाचे लक्ष लागले आहे. अशीच मोठी कारवाई येणाऱ्या काळात होणारं असल्याची माहिती एलसीबी पथक प्रमुखाने व्यक्त केली.या कार्यवाहीत साह आरोपीसह वरली मटका सहित्य जप्त करण्यात आले आहे. एक आरोपी फारार होण्यात यशस्वी झाला .
मारेगाव तालुका अवैध व्यवसायाचे माहेरचे घर झाले आहे. पोलिसांचा वचक संपल्याने तालुक्यासह शहरातील गल्लोगल्ली वरली मटक्यासह अवैध व्यवसायात तेजीत सुरु आहे. पठाणी वसुली करावी ,त्याप्रमाणे पोलीस विभाग या व्यवसायाकडे आर्थिक गणिताचे आकडेमोड करताना दिसत आहे. ३ सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजताच्या दरम्यान एलसीबीच्या पथकाने शासकीय गोडाऊन जवळ धाड टाकत सहा आरोपींना अटक केली. तर एक मुख्य आरोपी फरार होण्यात यशस्वी झाला. यात हरिदास किनके, बंडू मत्ते वय ४२, आयुब शेख, वय 28 , अन्वर खान, वय ४५, गुरुदेव राऊत, वय १८, लक्ष्मण इंगोले, वय ६० , देविदास शेंडे ,वय ४० , हे सर्व मांरेगाव यांना अटक करण्यात आली. यांच्याकडून चार मोबाईल ,15 हजार 780 रुपये, व मटका साहित्य जप्त करण्यात आले. सदर कारवाई एलसीबी चे पथक प्रमुख पोलीस निरीक्षक योगेश रंधे, उल्हास कुरकुटे ,महेश नाईक धनंजय श्रीरामे ,शहजाद शेख नीतीश कुठे यानी केली. सध्या जिल्ह्यात गणेशोत्सव व नवरात्र उत्सव वाची मोठी धुमधाम असणार आहे. या कालखंडामध्ये अवैध व्यवसाय डोके वर काढणार आहे. त्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षकांनी ज्या पोलीस स्टेशन अंतर्गत अवैध व्यवसाय सुरू असतील. त्या पोलीस निरीक्षकासह संबंधित जमादाराला निलबित करण्याचे आदेश पारित केले आहे.
१)ज्या पोलीस स्टेशन विभागांतर्गत एलसीबीने कारवाई केली असेल तेथील संबंधितावर खडक कारवाई करण्यात येईल.दिलीप भुजबळ पोलीस अधीक्षक यवतमाळ
२)काल रात्री आमच्या जिल्हा पोलीस अधीक्षकांचे आदेश आले आहे त्यानुसार मारेगाव पोलिसांवर कार्यवाही करण्यात येईल.सतीश पुज्जलवारउपविभागीय पोलीस अधिकारी वणी
मारेगाव पोलिसांनी सकाळी 11 वाजता अवैध व्यवसायावर कारवाई करत ११७०रुपयांची नाममात्र कार्यवाही केली. मात्र त्याच दिवशी दुपारी एक वाजता एलसीब पथकाने मोठी कारवाई केल्याने मारेगाव पोलिसांचे पितळ उघडे पडले असल्याची जोरदार चर्चा तालुका भर सुरू आहे.