आत्महत्येची धग..
युवकाची विष प्राशन करून आत्महत्या
मारेगाव:- प्रतिनिधी
आत्महत्येचे सत्र कायम असताना मारेगाव तालुक्यातील बोरी (गदाजी) येथील युवक पुंडलिक मारोती रुयारकर 43 यांनी रात्री 10 च्या सुमारास स्वतःच्या शेतामध्ये जाऊन विष प्राशन केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली.
पुंडलिक हे 31 आगस्ट च्या रात्री 9 च्या सुमारास अचानक घरातून निघून गेले त्यांच्या शोध घरच्यांनी सर्वत्र घेतला परंतु त्यांचा कुठे ही पत्ता लागला नाही.अखेर आज सकाळी त्यांच्या घरचे काही मंडळी शेतामध्ये गेले असता त्यांना पुंडलिक हे विष प्राशन करून आत्महत्या केल्याचे दिसून आले.
मृतक पुंडलिक यांच्या वडिलांच्या नावाने 3 एकर शेती आहे. अतिवृष्टी मूळे व नापिकी ला कंटाळून आत्महत्या केल्याची चर्चा बोरी येथे आहे
मृतक पुंडलिक यांच्या पश्चात आई,वडील,पत्नी,दोन मुली आणि एक मुलगा असा आप्त परिवार आहे