आत्महत्येची धग...
पुन्हा शेतकरी पुत्राने घेतले विष
🔸सलग आत्महत्येने मारेगाव तालुका हादरला
मारेगाव तालुक्यात आत्महत्या स्पर्धेचे स्वरूप प्राप्त होतांनाचे गंभीर चित्र दिसत आहे.मागील तीन दिवसात झालेल्या चार आत्महत्येत पुन्हा भर पडत आज मंगळवार दि.३० ऑगस्ट राजी शेतकरी पुत्राने विष ग्रहण करीत इहलोकाची यात्रा केल्याची दुर्देवी घटना उघडकीस आली.
सचिन सुभाष बोडेकर (२६) रा.रामेश्वर ता.मारेगाव असे विष प्राशन करून जीवनयात्रा संपविलेल्या शेतकरी पुत्राचे नाव आहे.वडिलोपार्जित असलेल्या दोन एकर शेतीवर आई वडील सह बहीण भावंडांचा उदरनिर्वाह चालायचा. यंदाच्या अतिवृष्ठीने हातचे उभे पीक पाण्यात गेल्याने त्यांचा जगण्याचा प्रश्न ऐरणीवर आला.
अशातच हातचे पीक गेल्याने उमद्या मुलावर असलेल्या उत्पादनावर अपेक्षावर पाणी फेरल्या गेल्याने त्याच्यात अस्वस्थता होती.ही विवंचना जिव्हारी लावत शेतकरी पुत्राने आज विष प्राशन करून जीवनयात्रा संपविली.त्याच्या पश्चात आई वडील व बहीण आहे.
मागील तीन दिवसापासून सातत्याने होत असलेल्या आत्महत्येने तालुका गंभीर सावटात आहे.या प्रश्नावर शासन / प्रशासन मात्र मूग गिळून आहे.