मारेगावात दौड स्पर्धा...
प्रविण लांडे व क्रिश मिस्त्री ठरले अव्वल
🔸शेतकरी शिक्षण संस्थेच्या पुढाकार
🔸दोन गटातील स्पर्धा ठरली लक्षवेधी
मारेगाव : प्रतिनिधी
भारताचे महान हॉकी पटू मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून मारेगाव कला - वाणिज्य व विज्ञान महाविद्यालया कडून १८ वर्षा वरील व खालील विद्यार्थ्यांची दौड स्पर्धा मारेगाव येथे आज दि.२९ ऑगष्ट रोजी आयोजित करण्यात आली.
दोन्ही गटात उत्स्फूर्तपणे सहभाग दर्शविलेल्या शेकडो विद्यार्थ्यांना शेतकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष जीवन कापसे , प्राचार्य डॉ.अविनाश घरडे व नगराध्यक्ष डॉ.मनीष मस्की यांनी हिरवी झेंडी दाखवीत तीन कि. मी.चे अंतर पार केले.
या स्पर्धेत १८ वर्षे वयोगटा वरील प्रवीण लांडे याने प्रथम , कुणाल चौधरी याने दुसरा तर प्रविण नारनवरे याने तिसरा क्रमांक पटकाविला.
१८ वर्षा आतील स्पर्धेत क्रीश सतीदंर मिस्त्री याने प्रथम , ओम कैलास ढवळे याने द्वितीय तर निकुंज अनिल किरमिरे याने तिसरा क्रमांक पटकाविला. स्थानिक डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात झालेल्या बक्षिस वितरण सोहळयात दोन्ही गटातील स्पर्धेतील प्रथम तीन विजयी विद्यार्थ्यांना अनुक्रमे ३०००, २०००,१००० रोख स्वरूपातील बक्षिसासह मानचिन्ह व प्रमाणपत्र संस्थाध्यक्ष जीवन कापसे , नगराध्यक्ष डॉ.मनीष मस्की , प्राचार्य डॉ.अविनाश घरडे , उपनिरीक्षक सावंत यांचे हस्ते प्रदान करण्यात आले.यावेळी प्रविन सूर , गणेश परचाके, पप्पू साहू यांना प्रोत्साहानपर बक्षीस प्रदान करण्यात आले.
शेतकरी शिक्षण संस्था मारेगाव द्वारा आयोजित दौड स्पर्धेत क्रीडा , शारिरीक शिक्षण विभागाचे संचालक डॉ.नितेश भाऊराव राऊत , डॉ.गजानन सोडनर, डॉ.अनिल आडसरे , प्रा.बाळासाहेब देशमुख , डॉ.सुधीर चिरडे , डॉ.संतोष गायकवाड , प्रा.अविनाश चिंचोलकर , प्रा.सतीश पांडे , रविंद्र धानोरकर आदींनी पुढाकार घेतला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.विनोद चव्हाण तर डॉ.राजेश चवरे यांनी आभार मानले.