आत्महत्येची धग...
पूर आणि अतिवृष्ठीने घेतला पुन्हा शेतकऱ्याचा बळी
🔸मारेगाव तालुक्यातील शिवणी येथील शेतकऱ्याने घेतला विषाचा घोट
🔸अल्पभूधारक शेतकऱ्याची जमीन खरडून गेल्याने केला जीवनाचा अखेर
मारेगाव : प्रतिनिधी
अल्पभूधारक शेतकऱ्याची शेत जमीन पूर आणि अतिवृष्ठीने खरडून गेली.त्यातच बँकेचे व खासगी कर्ज शिरावर असतांना येणाऱ्या काळात कुटुंबाचा गाडा कसा हाकावा ही विवंचना सतावत असतांना तालुक्यातील शिवणी (धोबे ) येथील शेतकऱ्याने विष प्राशन करून जीवनयात्रा संपविल्याची घटना आज दिनांक ३० ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता घडली.तालुक्यात सलग होणाऱ्या शेतकरी आत्महत्येने तालुका प्रभावित होत आहे.
हरिदास सूर्यभान टोनपे (४८) असे मोनोसिल नामक कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केलेल्या अल्पभूधारक शेतकऱ्याचे नाव आहे.त्यांचे कडे पाच एकर शेती आहे.कपाशी व तूर पेरणी केलेल्या शेतात यंदाच्या पूरपरिस्थिती व अतिवृष्ठीने शेती पूर्णतः खरडून गेली.त्यामुळे येणाऱ्या काळात जगायचे कसे ही विवंचना सतावत होती.त्यातच मारेगाव बँकेचे व खासगी कर्जाचे ओझे त्याच्या शिरावर होते.
आज सकाळी दहा वाजताचे दरम्यान पत्नी शेतात तर मुलगा व मुलगी शाळेत गेले असता स्वतःचे घरीच मोनोसिल नामक कीटकनाशक द्रव्य प्राशन करून जीवनयात्रा संपविली.