आत्महत्येची धग...
युवा शेतकऱ्याने गळफास लावून संपविली जीवनयात्रा
🔸मारेगाव तालुक्यातील नरसाळा येथील घटना
मारेगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील नरसाळा येथील अल्पभूधारक युवा शेतकऱ्याने निंबाच्या झाडाला गळफास लावून जीवनयात्रा संपविल्याची घटना आज दि.२७ ऑगष्ट रोजी सकाळी ८ वाजताचे दरम्यान उघडकीस आली.
गजानन नारायण मुसळे (२८ ) रा. नरसाळा असे गळफास लावून आत्महत्या केलेल्या अल्पभूधारक युवा शेतकऱ्याचे नाव आहे.
यंदाच्या अतिवृष्टी ने पिकांची वाढ खुंटली आहे.त्यातच शेतात पिकापेक्षा कचऱ्याची वाढ झाली असून येणाऱ्या अत्यल्प उत्पादनात कमालीची घट होण्याची संभाव्य शक्यता असल्याने मागील काही दिवसांपासून तो आर्थिक विवंचनेत असतांना आज नेहमी प्रमाणे तो गुरे चारण्यासाठी सकाळी शेतात गेला.रस्त्यालगत असलेल्या निंबाच्या झाडाला त्याने गळफास घेत जीवनयात्रा संपविल्याची दुर्देवी घटना उघडकीस आली.
त्यांचेकडे चार एकर कोरडवाहू शेती असल्याचे कळते.आत्महत्येचे नेमके कारण अतिवृष्टी असल्याचे कळते.मृतक गजानन यांच्या पश्चात आई , वडील व भाऊ आहे.