एक लाख किमी चा भारत भ्रमण करतोय तो ध्येयवेडा.....!
🔸सायकलच त्याची सोबती.
तो उत्तर प्रदेश चा.ग्रॅज्युएशन झाल्यावर आता कामाला लाग, सरकारी नौकरी च्या मागे धाव असा बापाने सल्ला दिला,तो धावला सायकल घेऊन भारत भ्रमण करायला....!
खिशात एकशे चाळीस रुपये घेऊन.झपाटलेला २० वर्षाचा प्रदीप यादव एक लाख किलोमीटर भारत भ्रमण आणि संपुर्ण देशात एक लाख वृक्षारोपण चा संकल्प घेऊन सायकल प्रवास करत आहे.
आज त्याची सायकल वारी वणी मार्गे मारेगाव होत यवतमाळ ला गेली.उत्तर प्रदेश च्या गाजीपुर जिल्ह्यातील जमानिया येथील हा ध्येयवेडा तरुण २८ आक्टोबर २०२१ ला सायकल भ्रमण वर निघाला.कुटुंबातील सदस्यांनी प्रचंड विरोध केला.वेडा झालास तू,फालतू धंदे सोड. काम कर असा सल्ला दिला.
काम करणे के लिये तो सारी जिंदगी पडी है पापा, कुछ दिन अपने लिये भी जी लेता हूं, देश को करीब से देखकर और एक लाख पेड लागकर आता हूं म्हणत त्याने सायकल काढली.
आत्तापर्यंत २२ हजार किमी प्रवास करीत १२ राज्य पार करून महाराष्ट्रात दाखल झाला.या प्रवासात प्रदीप ने पर्यावरण जपण्यासाठी अनेक शाळेत प्रबोधन करीत हजारो झाडे लावली.तो दररोज शंभर किमी सायकल चालवतो.
रात्री एखाद्या मंदिर च्या आवारात तंबू लावून झोपतो.सकाळी एखादा सामाजिक बांधिलकी जपणारा जेवण देतो.एखाद्या पेट्रोल पंपावर आंघोळ होते. पुन्हा सायकल प्रवास सूर होतो. मारेगावात त्याची भेट एड़. मेहमुद खान यांच्याशी झाली.त्यांच्या घरी पुरणपोळी चा आस्वाद घेऊन तो पुढे निघाला. आता नाशिक,मुंबई होत तो गुजरात, मध्यप्रदेश दिल्ली पंजाब हरियाणा राजस्थान काश्मिर होत गावी परतणार आहे.
जिंदगीचा अनोखा अनुभव घेऊन.....!