आत्महत्येची धग...
भावापाठोपाठ लहाण्याने घेतले' राउंडअप' तणनाशक विष
🔸वार्धक्यात असलेल्या मायबापा सह पंचक्रोशीत हादरा
🔸मारेगाव तालुक्यातील म्हैसदोडका येथील भयाण वास्तव
🔸तालुक्यात मरण झाले स्वस्त , गावात पुरती पसरली शोककळा
मारेगाव : दीपक डोहणे
मारेगाव तालुक्यात सण वार असो की नसो , आत्महत्येचे सातत्य हे तालुक्याच्या नशिबी चिकटलेले भयाण वास्तव.सणासुदीच्या दिवसात हृदयाला चिडफार करणारा प्रसंग मारेगाव तालुक्यातील म्हैसदोडका येथे घडला.तंतोतंत महिन्याभरात तीन भावंडातील मजव्याने विष घेवुन इहलोकाची यात्रा केली तर लहाण्याने ऐन पोळा सणाच्या सकाळीच राऊंडअप नामक तणनाशक विष घेऊन जीवनयात्रा संपविल्याची हृदय पिळवटून टाकणारी घटना उघडकीस आली.वार्धक्यातील आधारवड असलेल्या दोन जवान लेकरांच्या मृत्यूने मायबापावर पुरते संकट कोसळून जबर हादरा बसला आहे.
दोन तीन दिवसाआड आत्महत्या ही मारेगाव तालुक्याची ओळख आता जिल्ह्याच्या नकाशावर घट्ट ओळख होत आहे.मात्र या आत्महत्या थांबविण्यासाठी कोणतीही सामाजिक अथवा राजकीय संघटना धजावत नाही हेच तालुक्याचे दुर्देव ! असाच मनाला चटका लावून जाणारी दुर्देवी घटना आज शनिवारला उघडकीस आली.मारेगाव तालुक्यातील म्हैसदोडका येथील वासुदेव व मंदा बोथले या वार्धक्यात असलेल्या अल्पभूधारक शेतकरी दाम्पत्याचे शंकर , संतोष व सतीश हे तीन मुलं. तिघेही विवाहित असतांना आपल्या कामात व्यग्र राहत कुटुंबाचा गाडा हाकत असतांना दोन सख्ख्या भावाने विष घेतले.
संतोष वासुदेव बोथले (३५) नामक दुसऱ्या नंबर चा मुलगा गडचांदुर येथे कंपनीत कार्यरत होता. अडेगाव येथे वास्तव्यात असलेल्या संतोषने मागील २५ जुलै रोजी विष प्राशन करून आयुष्याचा अखेर केला.त्याच्या मागे पत्नी व दोन कोवळी मुले आहेत.आठवड्या पूर्वी संतोषची तेरवी म्हैसदोडका येथे करण्यात आली. तोच लहानगा सालदार म्हणून काम करणारा सतीश वासुदेव बोथले(३२) याने आज दि.२६ ऑगष्ठ रोजी ऐन पोळा सणाच्या दिवसाला सकाळीच तणनाशक ' राऊंडअप' विष ग्रहण केले.तात्काळ मारेगाव रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर त्याला चंद्रपूर येथे हलविण्यात आले आहे.उपचारादरम्यान त्याचा सायंकाळी सहा वाजता मृत्यू झाला.त्याच्या पश्चात पत्नी वर्षा व ६ वर्षाची गुंजन मुलगी आणि ३ वर्षाचा वेदांत नामक मुलगा आहे. विशेष म्हणजे आत्महत्या केलेल्या दोन्ही सख्ख्या भावाच्या पत्नी या सख्ख्या बहिणी आहेत.
दरम्यान , या दोन लेकरांच्या दुर्देवी घटनेने वार्धक्यात असलेल्या मायबापाचे हृदय पुर्णतः काळवटले आहे.दोन्ही लेकराच्या जबर धक्क्याने शून्यात बघणाऱ्या मायबापाने दोन्ही सुने वर मुलांना इहलोकाची यात्रा दाखविल्याचा आरोप केला आहे.या थरकाप व वेदनादायी घटनेने म्हैसदोडका गावात पुरती शोककळा पसरली आहे.परिणामी सतीश याचा मृतदेह मूळ गाव असलेल्या म्हैसदोडका येथे आणण्यात आला आहे.